घसा खवखवणं म्हणजे केवळ कोरोनाचं लक्षण नव्हे | वाचा सविस्तर
नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर : भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.
मंगळवारी ६० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. देशात सलग सहाव्या दिवशी ७५ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. सलग १० व्या दिवशी एक हजारापेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.
दरम्यान, मागील सहा महिन्यांमध्ये लाखो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराची विविध लक्षणं समोर आली आहेत. अजूनही वेगवेगळी लक्षणं समोर येत आहेत. यामध्ये घसा खवखवणं हे कोरोनाचं लक्षण आहे की नाही हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. मात्र लोकांच्या मनात घसा खवखवण्यावरून मोठा संभ्रम असल्याचं समोर आलं होतं.
जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराची विविध लक्षणं समोर आणली असून घसा खवखवणं देखील यामधील एक लक्षण आहे. पण खरंच घसा खवखवण्याचा कोरोनाशी संबंधित आहे का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतंच चीनमध्ये केलेल्या अभ्यासात 55 हजार रुग्णांपैकी केवळ 14 टक्के कोरोना रुग्णांमध्ये घसा खवखवणं हे लक्षण आढळून आलं. अमेरिकेतील Centres for Disease Control and Prevention च्या म्हणण्यानुसार प्रत्येक रुग्णाचे शरीर वेगळे आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी लक्षणे आढळून येतात. त्यामुळे घसा खवखवणं प्रत्येक रुग्णामध्ये आढळून येत नाही.
त्याचबरोबर घसा खवखवणं म्हणजे केवळ कोरोना पॉझिटिव्ह असणं असं होत नाही. यामध्ये तुम्हाला इतर आजार असला तरीही तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात.यामध्ये थंडी, ताप, टॉन्सिल्स यासारख्या आजारामुळे देखील घशामध्ये खवखव जाणवते. खोकला हा सामान्य आजार असून कोरोनाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोरोनाची इतर कोणतीही लक्षणं किती तीव्रपणे जाणवत असतील, तर तुम्हाला टेस्ट करायला हवी असं देखील म्हटलं आहे.
News English Summary: The World Health Organization (WHO) has identified various symptoms of the disease, including sore throat. But is sore throat really related to corona? This is an important question. A recent study in China found that sore throats were a symptom in only 14 percent of 55,000 patients. According to the Centers for Disease Control and Prevention in the United States, every patient’s body is different. So everyone gets different symptoms. Therefore, sore throat is not found in every patient.
News English Title: Throat infection is not confirmed symptom of coronavirus News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना