Thyroid Remedies | थायरॉईड असेल तर असा करा कंट्रोल | जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय
Thyroid Remedies | थायरॉईड ही आपल्या शरीरातील एक लहान ग्रंथी असते. जिचा आकार अगदी एखाद्या फुलपाखरासारखा असतो. मुख्य म्हणजे हि ग्रंथी मानेच्या खालच्या भागात स्थित असते. शरीराच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणे हे या ग्रंथीचे मूळ कार्य असते. त्यामुळे चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड संप्रेरकांचं उत्सर्जन करते. जे शरीरातील पेशींना हे कार्य पूर्ण करण्यासाठी किती ऊर्जा वापरायची हे सांगतात. आपल्या शरीरातील थायरॉईड ग्रंथी जेव्हा अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते, तेव्हा आपले शरीर साहजिकच आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉईडीझम असे म्हणतात. मुख्य म्हणजे सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना ‘थायरॉईड’ हा रोग होऊ शकतो. विशेष म्हणजे, पुरुषांच्या महिलांमध्ये या पाच ते आठपट थायरॉईड समस्या अधिक आहे.
वेळीच चाचणी करून घेणे गरजेचे :
दरम्यान, शरीरातील थायरॉईड ग्रंथींच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास थकवा येणे, मनाची अस्वथता वाढणे, सतत अंगदुखी होणे असे अनेको त्रास जाणवतात. यामुळे थायरॉईडची वेळीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचारांसोबत काही आयुर्वेदीक उपचार पद्धतीदेखील फायदेशीर ठरतात. याकरिता आयुर्वेद तज्ञ अनेको उपाय सुचवतात. तर आज आपण यांपैकी काही जालीम आयुर्वेदीक उपाय जाणून घेणार आहोत. ज्याचा वापर केल्यास तुम्ही थायरॉइडवर यशस्वीरीत्या मात करू शकता अथवा हा त्रास किमान कमी करू शकता.
तणावमुक्त मस्तिष्क:
थायरॉईड ग्रंथी निष्क्रिय किंवा कमजोर असल्याचे मुख्य संकेत म्हणजे गाऊटचा त्रास. यामध्ये शरीरात युरिक अॅसिडची निर्मिती अत्याधिक प्रमाणात होते आणि शरीराचे नुकसान होऊ लागते. परिणामी यामुळे सांधेदुखी, अर्थ्राईटिस आणि मणक्याचे त्रास बळावतात. या त्रासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एरंडेलच्या तेलाने डोक्याला मसाज करणे फायद्याचे ठरते. कारण यामुळे मस्तिष्क अर्थात डोक्यावर भार राहत नाही. शिवाय असे केल्यास थायरॉईड ग्रंथीला चालना मिळते. परिणामी रक्तदाब कमी होतो आणि निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते. या व्यतिरिक्त नियमित १ टीस्पून एरंडेल तेल प्यायल्याने देखील फायदा होतो.
नस्य उपचारपद्धती:
नस्य म्हणजे नाक. आयुर्वेद सांगते कि, नाकपुडीतून शरीरात तेल सोडल्यास थायरॉईड ग्रंथी जागृत होतात. या उपचाराला आयुर्वेदीक भाषेत नस्य उपचारपद्धती असे म्हणतात. या उपचार पद्धतीत मान थोडी तिरकी करून नाकपुडीतून तेल शरीरात सोडले जाते. यासाठी तिळाच्या तेलात आलं मिसळून तयार केलेलं तेल वापरावे. यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीला वेगाने चालना मिळते.
पादाभ्यंग:
पादाभ्यंग म्हणजेच पायाला मसाज. यात विशुद्ध चक्र किंवा थ्रोट चक्र याला मसाज केल्याने थायरॉईडची समस्या आटोक्यात ठेवता येते. शिवाय तळव्याला काही विशिष्ट पॉईंट असतात ज्यावर मसाज केल्याने हा त्रास अगदी सहजोगत्या कमी करता येतो. यासाठी पायाच्या तळव्याला एकाच दिशेने गोलाकार पद्धतीने हलका मसाज करावा. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो आणि आरामदायी वाटते.
प्रो बायोटिक फूड:
आयुर्वेदानुसार, अनेक आजार आटोक्यात आणण्यासाठी आधी पचनाचे विकार आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता प्रोबायोटिकचा आहारात समावेश करणे लाभदायक ठरते. यासाठी ताक, दही, योगर्ट, पनीर यांचा आहारात समावेश करा.
ध्यानधारणा व योगाभ्यास:
शरीरातील adrenal gland कमजोर झाला असेल तर थायरॉईडच्या पातळीमध्ये निश्चितच असंतुलन निर्माण होते. परिणामी थायरॉइडचा त्रास बळावतो. त्यामुळे Adrenal Gland’ची विशेष काळजी घेण्यासाठी पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. यासाठी दररोज न चुकता योगाभ्यासात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणा करा. यामुळे शरीरातील घातक घटक बाहेर पडण्यास अधिक मदत होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Health Title: Thyroid symptoms and ayurvedic remedies check details 20 June 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा