23 February 2025 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Health First | तुमच्या मुलांना ‘या’ वाईट सवयी आहेत का? तर आताच व्हा सावध

Parenting

मुंबई, ०३ जुलै | आपल्या मुलांना वाईट सवयी लागू नये म्हणून पालक नेहमी सजग असतात. मुलाला जितक्या वाईट सवयी असतात तितकी लोकं नावं ठेवतात. जर वेळीच या वाईट सवयींना आवर घातला नाहीतर मोठेपणी सुद्धा ती सवय जाणार नाही आणि कोणत्याच पालकाला आपल्या मुलाला वाईट सवयी असाव्यात असे वाटत नाही. पण या वाईट सवयी घालवायच्या कशा हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावत असतो. मार्ग म्हणण्यापेक्षा आपण याला टिप्स म्हणूया. या टिप्स तुम्ही वापरल्यात तर तुमच्या मुलाच्या वाईट सवयी सहज दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या रामबाण टिप्स.

नखे कापणे:
वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वाढलेल्या नखांच्या खोबणीत मळ, जंतांची अंडी, माती, इत्यादी पदार्थ साठतात. यातून स्वतःला व इतरांना संसर्ग होत राहतो. दर 2-3 आठवड्यांनी हातापायाची नखे काढावीत. लहान मुलांना नखे काढायची सवय लावावी.

दात घासणे:
दात घासणे दातांच्या फटीत अन्नकण अडकून व दातांवर अन्नाचा सूक्ष्म थर जमून जंतूंची वाढ होते. त्यामुळे दात लवकर किडतात. जंतूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि हिरड्या सुजतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरावी. याचबरोबर दात, हिरड्या चोळून धुणे आवश्‍यक असते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात साफ करणे आवश्‍यक आहे. दात घासण्यासाठी फक्त ब्रश किंवा दातवण काडी (चावून धागे मोकळे झालेली) पुरते. टूथपेस्टची उपयुक्तता मर्यादित आहे. पेस्ट नसल्यास नुसता ब्रश पुरतो.

गोड चवीच्या टूथपेस्टपेक्षा कडू, तुरट, तिखट, खारट चवीची मंजने दातावरचे चिकट आवरण सहज काढतात. यासाठी साधी राख किंवा कोळशाची पूडही चालते. दातांच्या फटी साफ करण्यासाठी मात्र ब्रश किंवा दातवण लागते. बाभूळ, कडूनिंब यांच्या काड्या दातवणासाठी सर्रास वापरल्या जातात. ही चांगली पद्धत आहे. मिश्रीने मात्र दातावर किटण चढते. आरोग्याच्या दृष्टीने मिश्रीचा वापर चुकीचा आहे.

ब्रश वापरण्याची पद्धत महत्त्वाची आहे. ब्रश आडवा न चालवता’खाली-वर’ फिरवला पाहिजे म्हणजे फटी स्वच्छ होतील. हिरड्या बोटाने चोळणेही दात घासण्याइतकेच महत्त्वाचे आहे. हिरड्या चोळण्याने तिथला रक्तप्रवाह सुधारतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Article Disclaimer: आरोग्य विषयक आर्टिकलमध्ये दिलेले उपाय हे सामान्य मार्गदर्शन आणि माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

News Title:  Tips for changing bad habits of our child in Marathi health news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x