Health First | लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे उपाय करा
मुंबई, २९ जुलै | तसं बघायला गेलं तर साधारणपणे सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात त्यामुळे भुक न लागणं हा कोणताही आजार नाहीये. पण हो, भूक न लागणं हा होणा-या आजाराचा संकेत जरुर असू शकतो. त्याव्यतीरिक्त मनासारखं जेवण किंवा चटपटीत गोष्टी न मिळाल्याने मुलं जेवताना किटकिट करत राहतात. म्हणूच मुलांना वेळेत जेवायला लावणं कठीण काम असतं. काही मुलं तर जेवण्यास स्पष्ट नकार देतात, त्यामुळे त्यांना तासनतास समजावत बसावं लागतं. तर काही मुलांना जेवण नाही तर मॅगी, न्युड्ल्स किंवा फास्ट फुड जास्त आवडतं आणि व्यव्स्थित न जेवल्याने त्यांना कमजोरी येते.
मुलांचे खाणेपिणे योग्य नसल्याने वयाच्या मानाने त्यांचे वजन कमी होते. यामुळे त्यांच्या वजनासाठी महत्त्वाचे म्हणजे आहार होय. परंतु, मुले खाण्याच्या बाबतीत फार कंटाळा करतात. अशा वेळी त्यांना आवडीचे पौष्टिक पदार्थ दिल्यास त्यांचे वजन संतुलित राहू शकते. आपली मुले पुरेसे जेवत नाहीत अशी अनेक पालकांची तक्रार असते. लहान मुले जेवत नसल्यास किंवा मुलाला भूक कमी लागत असल्यास, पालकांना मुलाच्या आरोग्याची चिंता वाटू लागते. मुलाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी वाढत्या वयामध्ये योग्य आहार घेणे आवश्यक असते. मात्र अनेक मुलांना पुरेशी भूक न लागण्याची तक्रार असते.
लहान मुलांमध्ये फास्टफूड, जंकफूड, अतिगोड खाणे किंवा कृमी यामुळे भूक न लागण्याच्या तक्रारी होत असतात. कारण फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स यासारख्या अयोग्य आहारामुळे पोट भरते त्यामुळे जेवण खाताना मात्र भूक लागत नाही. तसेच वरील पदार्थात फायबर्स आणि इतर पोषकतत्वे नसतात त्यामुळे नियमित पोट साफ न होण्याच्या तक्रारी निर्माण होतात. परिणामी पचनसंस्थेचे आरोग्य धोक्यात येऊन लहान मुलांची भूक कमी होत असते.
लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे करा उपाय:
मुलाला आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत:
मुलाला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत. रोजरोज एकसारखी भाजी खाऊन मुलांना कंटाळा येऊ शकतो. यासाठी वरचेवर नवीन पदार्थ मुलांना खाऊ घालावेत.
मुलांच्या बाहेरच्या खाण्यावर लक्ष ठेवावे:
अनेकदा लहान मुले ही दिवसभरात चॉकलेट, बिस्किटे, केक, स्नॅक्स, चिप्स, फरसाण वैगरे पदार्थ खात असतात. त्यामुळे अशा पदार्थांनी आधीच पोट भरल्यामुळे जेवताना भूक लागत नाही. अशावेळी ते जेवण खाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे लहान मूल दिवसभरात काय खाते याकडेही लक्ष द्यावे. मुलाला जेवताना भूक लागत नसल्यास काही दिवस त्याला फास्टफूड, बिस्किटे, चॉकलेट, स्नॅक्स असे पदार्थ देणे टाळावे.
मुलाला बाहेर खेळण्यास पाठवावे:
मैदानी खेळ खेळण्यामुळे मुलाचा व्यायाम होतो व खाल्लेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते. त्यामुळे खेळून भागून आल्यावर मुलाला चांगलीच भूक लागते! त्यामुळे मुलाच्या व्यायामाकडे लक्ष द्यावे. सकाळी व संध्याकाळी त्याला फिरण्यास घेऊन जावे, मैदानी खेळ, दोरीउड्या, पळणे, सायकल चालवणे असे व्यायाम मुलाला करू द्यावेत.
पुढील पदार्थ दिल्यास त्यांचे वजन संतुलित राहू शकते:
* मुलांचे वजन कमी असेल तर त्यांना सायीचे दूध द्या. त्यांना दूध पिणे आवडत नसेल तर शेक बनवून द्या.
* वजन वाढवण्यासाठी तूप व लोणी फायद्याचे आहे. तूप किंवा लोणी वरणात मिसळून देता येईल.
* सूप, सॅंडव्हिच, खीर व शिरा – या चारही गोष्टी योग्य प्रमाणात दिल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहेत. मुलेही हे पदार्थ आवडीने खातात.
* बटाट्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. बटाटा उकळून खायला द्या. मोड आलेल्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. मुलांच्या वाढीसाठी हे लाभदायक आहे. मूल फार लहान असेल तर त्याला वरणाचे पाणी द्या.
* मुलाला स्वस्त बनवण्यासाठी त्याचा व्यवहार व दिनचर्येकडे लक्ष द्या. लहान मुलांना याची नितांत आवश्यकता असते. लहान बाळांना योग्य वेळी खुराक द्या व त्यांच्याकडे लक्ष द्या.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Tips on Loss of Appetite for Children in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा