20 April 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

मोफत XraySetu सेवा लाँच | व्हॉट्सअ‍ॅपवर एक्स-रे पाठवा आणि कोरोना आहे की नाही ते कळेल

XRaySetu WhatsApp Service

नवी दिल्ली, ०२ जून | केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात देशवासियांसाठी एक मोठा दिलासा देणारे पाऊल उचलले आहे. कोरोना आहे की नाही हे मिनिटांत कळण्यासाठी XraySetu सुविधा मोफत देऊ केली आहे. याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर छातीचा एक्स-रे पाठवून कोरोनाची बाधा आहे की नाही हे कळविले जाणार आहे.

ही सुविधा ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. सध्या यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाहीय. चला जाणून घेऊया XraySetu काय आहे, कसे वापरावे:

  • वास्तविक XraySetu हे एक एआय बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. जो व्हॉट्सअ‍ॅपवर ऑपरेट केला जातो. ही सुविधा इंडियन इन्स्टट्यूट ऑफ सायन्सद्वारे स्थापित एनजीओ Artpark आणि भारत सरकारच्या विद्यमाने सुरु करण्यात आली आहे. ही सेवा डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजीने एक हेल्थटेक स्टार्टअप Niramai सोबत मिळून डेव्हलप केली आहे.
  • ग्रामीण भागात छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे सुविधा असते. मात्र, या भागात RT-PCR किंवा CT-Scan करणे कठीण असते. लोकांना परवडणारे देखील नसते. यामुळे XraySetu द्वारे एक्स रे वरून कोरोना आहे की नाही याची माहिती मिळणार आहे, असे Artpark चे सीईओ उमाकांत सोनी यांनी सांगितले.
  • पुढील सहा ते 8 महिने ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. जरी शुल्क असले तरीदेखील ते 100 रुपयांपेक्षा कमी असेल. ही सुविधा गेल्या आठवड्यापासून सुरु झाली असून 500 डॉक्टर याचा वापर करत ाहेत. पुढील 15 दिवसांत 10000 डॉक्टरांचे नेटवर्क बनविण्याची योजना आहे.
  • एक्स रे पाठविल्यावर 10 ते 15 मिनिटांत त्याचा रिपोर्ट तयार केला जातो. लो रिझोल्युशनच्या एक्सरेवरूनही कोरोना बाधित तपासता येणार आहे.

XraySetu कसे काम करणार:

  1. https://wwww.xraysetu.com वर जावे. ‘Try the Free X-raySetu Beta’ बटनावर क्लिक करावे.
  2. दुसऱ्या पेजवर गेल्यावर तुमच्या वेब किंवा स्मार्टफोनमध्ये वॉट्सऐप-बेस्ड चॅटबोट निवडू शकता.
  3. तो डॉक्टरला XraySetu सेवा सुरु करण्यासाठी +91 8046163838 या क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सांगेल.
  4. रुग्णाचा छातीचा एक्सरे काढलेला फोटो तिथे पाठवावा लागणार आहे. यानंतर काही वेळातच ऑटोमेटेड रिपोर्ट देण्यात येईल.

 

News English Summary: The central government has taken a big step of relief for the countrymen during the Corona crisis. The XraySetu feature is offered free of charge to know in minutes whether the Corona is there or not. This will send a chest X-ray to the WhatsApp number to let you know if the corona is obstructed.

News English Title: Union govt XRaySetu on WhatsApp can detect Covid19 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या