18 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

CND'ने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं | मोदींच्या नव्या भारताचंही समर्थन

United Nations, Cannabis, Not a dangerous narcotic, India Support

नवी दिल्ली, ४ डिसेंबर: आतंरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाची घटना घडली आहे ज्याचा जगावर आणि भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी या संबंधित निर्णय जाहीर केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटविण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. यासाठी झालेल्या एकत्रित मतदानात तब्बल २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतात सध्या गंजावरून अनेक सेलिब्रेटी एनसीबी’च्या रडारवर असताना भारताने देखील गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याहून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचे दोन प्रमुख शत्रू राष्ट्र चीन, पाकिस्तान आणि मित्र राष्ट्र रशिया यांसारख्या २५ देशांनी या निर्णयाच्या विरोधात मतदान केले. “या वेळी ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी आणि उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलं आहे.

युनायटेड नेशन्सच्या या महत्वपूर्ण निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठी देखील चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असं असलं मागील काही दिवसांपासून गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकिय फायद्यांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सध्या ५० पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकिय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये वैद्यकिय कारणासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र भारतासारख्या देशात याचे तरुणाईवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे बॉलीवूड, पेज थ्री लाइफस्टाईल आणि पब दुनियेत रंगणाऱ्या लोकांसाठी सर्व खुलं मैदान होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

 

News English Summary: An important event has taken place at the international level which is likely to have a major impact on the world and India. Many have been shocked by the exclusion of cannabis from the list of dangerous drugs after a historic vote at the United Nations. The United Nations Commission on Drugs and Crime (CND) announced the decision on Wednesday.

News English Title: United Nations decides Cannabis not a dangerous narcotic India News updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x