28 January 2025 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Health First | तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या आणि पहा परिणाम

useful copper

मुंबई ६ एप्रिल :रोज सकाळी पाणी प्यावे हे घरातले त्याचबरोबर डॉक्टर देखील सांगतात. पण पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे –
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हे अ‍ॅन्टीबॅक्टरीयल असल्यामुळे ज्याप्रमाणे तुमची रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठी लाभदायक ठरतं. अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत होतो.तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाणी हे शुद्ध मानलं जातं. डायरिया आणि कावीळ सारखे आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट झाल्याने हे आजार तुमच्यापासून दूर राहतात.

ज्यांना वारंवार कफ होतो अशांसाठी ही तांब्यातील पाणी अतिशय उपयुक्त असते. ८ तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.तांब या धातुमध्ये दाह कमी करण्याची क्षमता असते. संधीवात किंवा सांधेदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तर दररोज तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायला हवं. यामुळे हाडं मजबूत बनतात आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न (लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अ‍ॅनिमियाशी सामना करणार्‍यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

‘तांबं’ रक्तदाब, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवतो तसेच कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मीतीत तांबे प्रमुख भुमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.चेहऱ्यावर अकाली पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी फायदेशीर ठरतं. तांब्यातलं अ‍ॅन्टीऑक्सिडंट हे नवीन पेशी तयार करण्याचं काम करतं.

News English Summary: The family as well as the doctors tell you to drink water every morning. But drinking water in a copper cup is good for health. A few years ago, everyone had copper utensils in their house. But over time, glass and steel utensils began to be used. Copper pots have many features. It is always better to drink water from a copper vessel because the amount of copper that is good for health goes into the body. This kills the germs in the water. Copper strengthens vital organs such as the liver and bladder. Copper helps your brain and nervous system.

New English Title: Use copper vessel for drinking water news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x