26 December 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

कोरोना संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा विचारपूर्वक वापर करा | रेमडेसिविर देण्यावर बंदी - केंद्राच्या गाइडलाइन

corona infected children

नवी दिल्ली, 10 जून | केंद्र सरकारने कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. या नवीन नियमात संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला असून, रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिशा-निर्देशांमध्ये एसिम्पटोमेटिक केस आणि सौम्य लक्षणे असल्यावर स्टेरॉयडच्या वापराला घातक म्हटले आहे. गाइडलाइनमध्ये सांगितल्यानुसार, 18 पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या वापराबाबत योग्य आकडेवारी नसल्यामुळे इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

गाइडलाइंसमध्ये मुलांसाठी 6 मिनीटांच्या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आला आहे. वॉक टेट्सदरम्यान मुलांच्या बोटावर पल्स ऑक्सिमीटर लावून मुलांना सहा मिनीटे चालण्यास सांगावे. यानंतर मुलांची ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल आणि पल्स रेट चेक करावा. यामुळे हॅप्पी हाइपोक्सियाची लक्षणे कळू शकतात.

काय आहे हॅप्पी हाइपोक्सिया ?
जानकारांनी सांगितल्यानुसार, कोरोना महामारी आणि ब्लॅक फंगसदरम्यान हॅप्पी हायपोक्सियादेखील घातक ठरत आहे. हा आजार डॉक्टरांसाठी नवे आव्हान बनला आहे. या आजारात कोरोना लक्षणे आढळत नाहीत, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. डॉक्टरांचे म्हणने आहे की, हायपोक्सियात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. रुग्ण स्वतःला निरोगी समजतो, पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होते.

DGHS ने फक्त हॉस्पिटलमध्ये भरती गंभीर रुग्णांना कडक देखरेखीखाली स्टेरॉयडच्या वापराचा सल्ला दिला आहे. DGHS ने सांगितल्यानुसार, ‘स्टेरॉयडचा वापर योग्यवळी आणि योग्य प्रमाणात दिला जावा. तसेच, रुग्णाने स्वतः स्टेरॉयडचा वापर टाळावा.

 

News English Summary: The central government has issued new guidelines for the treatment of children infected with corona. The new rules advise prudent use of CT scans on infected children and prohibit the use of remedivir injections.

News English Title: Use CT scan wisely on corona infected children ban use of Remdesivir injection walk test advice news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x