Health First | मसाल्यातील महत्वाचा घटक असणाऱ्या जायफळाचे आहेत हे औषधी गुणधर्म
मुंबई १२ एप्रिल : काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळचा वापर करत असतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. जायफळमध्ये अनेक औषधी गुण असतात. पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. जायफळ हा एक असा मसाला आहे जो खूप कमी प्रमाणात जेवणामध्ये वापरला जातो, पण त्याचे फायचे तेवढेच शरीराला मिळतात. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन B3 व B6 आणि कॉपर जे शरीराला खूप फायदा देतात. आज आपण जायफळाचे सविस्तर फायदे जाणुन घेणार आहोत.
हृदयाचं आरोग्य राहतं उत्तम
जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.
मूड स्विंग उत्तम करतं
जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणणं
जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.
पाचनक्रियेसाठी फायदेशीर
जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.
संक्रमणापासून होणारे आजार राहतील दूर
जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं. म्हणूनच आपल्या जेवणात, स्वयंपाकात जायफळचा वापर केल्यानं संक्रमण होण्याची शक्यता कमीच असते. एव्हढंच नाही तर जायफळचं पावडर कुठल्याही इंफेक्शनच्या ठिकाणी लावलं तर ती जखम किंवा इंफेक्शन बरं होतं.
तोंडाची दुर्गंधी होते दूर
जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.
News English Summary: We use nutmeg in certain foods. But nutmeg has many miraculous benefits for our body. Nutmeg has many medicinal properties. Relieves pain, abdominal pain, cleansing the body, purifying the blood, killing germs in the mouth and keeping the teeth clean, keeping the blood supply in order, brightening the skin. Nutmeg is a spice that is rarely used in food, but its benefits are just as much to the body. It contains many vitamins and minerals. Fiber, Magnesium, Iron, Vitamins B3 and B6 and Copper which are very beneficial to the body. Today we are going to learn the detailed benefits of nutmeg.
News English Title: Use nutmeg and stay away several health problems news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो