22 November 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Health First | जाणून घ्या काय आहेत काळीमिरीचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of black pepper

मुंबई १० एप्रिल : मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे. मात्र या काळी मिरीचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. कोमट पाण्यामध्ये काळी मिरी टाकून प्यायल्यास आरोग्याला त्याचा लाभ होतो. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीमायक्रोबीयल गुणधर्मांनी युक्त असा हा मसाल्याचा पदार्थ ट्युमरच्या वाढीला नियंत्रित करतो. मेंदूला नवे तेज प्राप्त होऊन तो सतेज होतो. तसंच त्यात अँटीडिप्रेसंट गुणधर्म असतात.

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे.

गॅसची समस्या-
गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.

सर्दी-
काळी मिरी सर्दीसाठी देखील लाभदायक आहे. गरम दूधमध्ये काळी मिरी टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

खोकला-
खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.

News English Summary: Only black pepper is known as a spice. But black pepper also has many health benefits. Drinking black pepper in lukewarm water has health benefits. Similarly, this spice, which has antioxidant and antimicrobial properties, regulates tumor growth. The brain receives new energy and is refreshed. It also has antidepressant properties.

News English Title: Use of black pepper is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x