कोरोना परिस्थितीचा आढावा | पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक

नवी दिल्ली, १७ मार्च: देशात मंगळवारी 28,869 कोरोना पॉझिटिव्ह आढळले.17,746 बरे झाले आणि 187 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 10,935 ची वाढ झाली. नवीन संक्रमितांचा आकडा जवळपास तीन महिने मागे गेला आहे. यापेक्षा जास्त 30,354 केस 12 डिसेंबरला आल्या होत्या. मंगळवारी नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 17,864 रुग्ण केवळ महाराष्ट्रातच आढळले होते.
देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 38 हजार 464 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 10 लाख 43 हजार 337 बरे झाले आहेत. 1 लाख 59 हजार 79 ने जीव गमावला आहे. तर 2 लाख 31 हजार 335 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा एकदा थैमान घालत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, इतर राज्यातील परिस्थितीही चिंताजनक होताना दिसत आहे. प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह इतर राज्यात केंद्रीय पथकं पाठवली असून, आज पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वार ही बैठक होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दुसरीकडे देशातील आकडाही झपाट्याने वाढू लागला आहे. इतर राज्यातही करोनाचा उद्रेक होत असल्यानं पंतप्रधानांनी तातडीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे होणाऱ्या बैठकीत करोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
News English Summary: Today, Prime Minister Narendra Modi is holding a meeting with all the Chief Ministers of the state. The meeting will be held at 12.30 pm through video conferencing and Chief Minister Uddhav Thackeray will also be present at the meeting.
News English Title: Video conference over increasing Covid case in India PM Modi meeting with States Chief Ministers news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL