22 November 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Health Fist | व्हिटॅमिन C’चे अतिसेवन तर होत नाही ना? | ठरु शकते आरोग्यास हानिकारक - वाचा सविस्तर

Vitamin C overdose

मुंबई, २१ जून | करोनाला हरवायचं असेल तर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असली तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. ‘क’ जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. ‘क’ जीवनसत्वामुळे पचनशक्ती सुरळीतपणे पार पडते. ‘क’ जीवनसत्वामुळे शरीराला अँटी ऑक्सिडेंट पुरेशा प्रमाणात मिळतात. रक्तदाब नियंत्रणात येतं. तसेच रक्त वाहिन्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतं.

शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करून हृदयासंबधित आजारांचा धोका कमी करतं. शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी करण्याचं काम ‘क’ जीवनसत्व करतं. तसंच गाठी असल्यास त्या कमी करण्यास मदत करतं. लोहाचं प्रमाण कमी असल्यास ‘क’ जीवनसत्वामुळे ती कमरता भरून निघते. तसंच अन्नपदार्थातून लोह शोषण्यास मदत करतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेषतः व्हिटॅमिन सी आणि झिंकच्या गोळ्या, च्यवनप्राश, काढा इत्यादींचे सेवन केले जाते. यातही जास्तीत जास्त भर व्हिटॅमिन सी घेण्यावर आहे कारण व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते असा विश्वास आहे. व्हिटॅमिन सी चे पाण्यामध्ये विघटन होते. शरीर हे साठवूत ठेवत नाही, म्हणून त्याचे पुरेसे स्तर बनवण्यासाठी लोकांना सप्लीमेंट आणि आहाराद्वारे ते घ्यावे लागेल. परंतु या प्रकरणात, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन सी चा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा परिस्थितीत एखाद्याचे आरोग्य सुधारण्याऐवजी ते आणखी बिघडू शकते.

शरीरासाठी व्हिटॅमिन सी किती आवश्यक आहे:
तज्ज्ञांच्या मते, दररोज 65 ते 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेणे कोणत्याही व्यक्तीसाठी पुरेसे असते. परंतु जर आपण 1000 मिलीग्रामपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेतले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सामान्यत: स्त्रियांनी 75 मिलीग्राम, पुरुषांसाठी 90 मिलीग्राम, गर्भवती महिलांसाठी 85 मिलीग्राम आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी 120 मिलीग्रामपर्यंत व्हिटॅमिन सी सेवन करावे.

जास्त प्रमाणात सेवन केल्याने उद्भवू शकतात या समस्या:
कोणत्याही गोष्टीचा अभाव आणि अधिक प्रमाण हानिकारक आहे. व्हिटॅमिन सीच्या अति वापरामुळे मळमळ, उलट्या, अतिसार, पोटदुखी, छातीत जळजळ, डोकेदुखी आणि निद्रानाश अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन सी का आहे आवश्यक:
व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट आहे जे कनेक्टिव टिश्यूजला चांगले बनवते आणि सांध्याला सपोर्ट देण्याचे कार्य करते. याव्यतिरिक्त, हे कोलेजन, एल-कॅरनिटिन आणि शरीरातील काही न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास उपयुक्त आहे. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अनेक संशोधनात असे दिसून येते की, व्हिटॅमिन सी तीव्र श्वसन संक्रमण रोखण्यात आणि टीबीवरील उपचारांमध्ये उपयुक्त आहे.

कोणत्या पदार्थांमधून मिळते व्हिटॅमिन सी:
संत्रा, किवी, हिरव्या आणि लाल शिमला मिरची, केळी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, पालक, पपई, अननस, लिंबू आणि आंबा इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Vitamin C overdose can be bad for health know how much it is enough for your body news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x