16 April 2025 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं

Why drinking water during meals

Drinking Water During Meals | जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते. जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच या 6 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा.

मानवी शरीररचनेनुसार, पोटातील डायजेस्टिव्ह अ‍ॅसिड पचन सुधारायला तसेच अन्नपदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या रसामुळे पोटात संसर्ग निर्माण करणारे घटक कमी होण्यास मदत होते. याला ‘ डायजेस्टिव्ह फायर’ असे देखील संबोधले जाते. खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करून शरीराला उर्जा पुरवण्याचे प्रमुख पोटातील एंजाईम्स करत असतात. पण जेव्हा हा रस पाण्यात विरघळून जातो तेव्हा पचनक्रियेसोबतच आतड्यांमध्ये क्रॅम्स येणे, दुखणे अशा समस्या अधिक उद्भवतात. यामुळे सारी पचनक्रिया संथ होते आणि बराच वेळ अन्न पोटात साचून राहिल्याने छोट्या आतड्याचे कार्यदेखील रेंगाळते. परिणामी शरीराला अन्नातून आवश्यक पोषणद्रव्यं मिळत नाहीत.

लाळनिर्मिती कमी होते:
पचनक्रियेची सुरवात ‘लाळे’तूनच होते. त्यातील एन्जाईम्स अन्नपदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात त्याचबरोबर पोटातील डायजेस्टिव्ह एन्जाईम्सना चालना देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. पण जर तुम्ही जेवताना पाणी सतत प्यायल्यास लाळ पाण्यामध्ये विरघळते. यामुळे तोंडात अन्नाचे विघटनही होण्याची प्रक्रिया कमी होते तसेच पचनक्रियादेखील मंदावते.

पित्त वाढते:
जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हेदेखील यामागील एक कारण असू शकते. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. परिणामी त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. पोटात काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच पाणी शोषून घेतले जाते. त्यानंतर पाणी पोटातील गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचेही विघटन करते. यामुळे डायजेस्टिव्ह एंन्जाईम्सदेखील कमी प्रमाणात शोषली जातात. त्यामुळे पित्त वाढणे, छातीत जळजळ वाढणे अशा समस्या वाढतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते:
जेवताना पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते.कारण जेव्हा खाल्लेल्या अन्नपदार्थांचे नीट पचन होत नाही तेव्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होऊन शरीरात काही घटक मेदाच्या स्वरूपातच शरीरात साठून राहतात. परिणामी रक्तातील साखरदेखील वाढते.

वजन वाढते:
जेवताना पाणी प्यायल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता देखील अधिक असते. रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण तसेच अन्नपदार्थांचे पुरेसे विघटन न झाल्याने शरीरात अतिरिक्त फॅट(मेद) साचून राहते. आयुर्वेदानुसार लठ्ठ्पणा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे दुबळी ‘डायजेस्टिव्ह फायर’. यामुळे शरीरातील वात, कफ, पित्त यांचा समतोल ढासळतो. तसेच आरोग्यदेखील बिघडते. जेवताना पाणी पिणे ही सवय असल्याने त्यापासून लगेच सुटका मिळणे शक्य नाही. परंतू या काही साध्या-सोप्या टीप्सने तुम्ही यावर मात करू शकता.

जेवणात मीठाचा वापर कमीत कमी करा:
मीठामुळे आपल्याला सतत तहान लागते. त्यामुळे आहारात आवश्यक तेवढाच मीठाचा वापर करा. अळणी जेवणात वरून मीठ घालू नका.

जेवण चावून खा, गिळू नका:
‘प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा.’ असे म्हटले जाते. कारण अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मीतीला चालना मिळते व पचनही सुधारते. तसेच अन्न चावून खाल्ल्याने त्याचे विघटन आणि पचन सुधारते. याबरोबरच अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मिती वाढते आणि पाणी पिण्याची इच्छा कमी होते.

जेवणाआधी 30 मिनिटे पाणी प्या:
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, वजन घटवण्यासाठी तसेच उत्तम मेटॅबॉलिक रेटसाठी जेवणापूर्वी 30 मिनिटे अगोदर साधे पाणी प्यावे. यामुळे जेवताना पाणी पिण्याची इच्छा कमी होते. तसेच पाणी तांब्याच्या भांड्यातून पिणे हे अधिक हितकारी आहे. पाण्याबाबत तर तुम्हांला सारी माहिती मिळाली पण जेवण जमिनीवर बसून व हाताने का जेवावे ? हे देखील जरूर जाणून घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Health Title: Drinking water during your meals is bad for you check details 29 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)Lifestyle(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या