आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी | WHO'चा महत्वपूर्ण निर्णय
वॉशिंग्टन, ०१ जानेवारी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार WHOकडून आपातकालीन वापरासाठी फायझर व बायोएटनेक यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली होती. (World Health Organisation grants emergency validation to Pfizer Covid Vaccine)
जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याने जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोनावरील लसीच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. गरीब देशांपर्यंत कोरोनावरील ल लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी एमर्जन्सी यूज लिस्टिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. या सूचीमध्ये दाखल झाल्यानंतर कुठल्याही कोरोनावरील लसीला जगभरातील देशांमध्ये सहजपणे आपातकालीन वापराची परवानगी मिळणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला करोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे. मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.
News English Summary: On the first day of the new year, the World Health Organization has made a big decision. Accordingly, a vaccine jointly developed by Pfizer and Bioetnech for emergency use has been approved by the WHO. The World Health Organization (WHO) has given the green light to the vaccine, raising the possibility of it being approved in many countries. Earlier, the United States, Canada and European Union countries, including the United Kingdom, had approved the use of the Pfizer-BioNTech vaccine.
News English Title: World Health Organisation grants emergency validation to Pfizer Covid Vaccine news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH