18 January 2025 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

World Mental Health Day 2021 | मुलांच्या मानसिक वाढ आणि विकासासाठी प्रभावी आहार - घ्या जाणून

World Mental Health Day 2021

मुंबई, 10 ऑक्टोबर | सदृढ आणि निकोप मानसिक वाढ, विकासासाठी मुलांच्या बालपणीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी आहारात योग्य अन्नपदार्थ पुरेशा प्रमाणात असतील याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे. त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात की योग्य पोषणतत्व असलेले पदार्थ जर आहारात अंतर्भूत असतील तर मुलांच्या मानसिक विकासाला चालना मिळते. आज (10 ऑक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day 2021) आहे. त्यानिमत्त जाणून घेऊया असे कोणते अन्न अथवा अन्नपदार्थ आहेत जे मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी ठरतात प्रभावी.

World Mental Health Day 2021. It is necessary to take care of children’s childhood for strong and sound mental growth and development. For this, it is important to make sure that the right foods are in the diet. Therefore, dieticians say that if the right nutrients are included in the diet, then the mental development of children is boosted :

अंडे:
अंडे हा एक खूप प्रथिने असलेले Food आहे. अंडे हा एक असा घटक आहे की ज्यात अधिक मात्रेत प्रोटीन आणि Cholesterol सुद्धा असते. अभ्याक सांगतात की बालकांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी अंड्यातील कोलीन नामक घटक अधिक महत्त्वाचा ठरतो. एका अंड्यात 125 मलीग्रॅम कोलीन असते. जे 4 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी अधिक आवश्यक असते.

पीनट बटर:
पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनवले जाते. शेंगदाण्यांमध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. तसेच एंटीऑक्सीडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असते. त्यातील थियामिन मानसिक आणि शारीरिक आरोग्यास उर्जा प्रदान करते. शरीराती उर्जेसाठी ग्लुकोज महत्त्वाचे असते जे थियामिनमधून मिळते. पीनट बटर आणि केळी यांचे सँडवीच, पीनट बटरसोबत सफरचंदाचे तुकडे, किंवा मुठभर शेंगदाण्यासोबत आपले आवडते सलाड आपण खाऊ शकता. ज्याचा चांगला फायदा होतो.

कडधान्ये:
मेंदूच्या विकासासाठी ग्लुकोजची निरंतर आवश्यकता असते. जी कडधान्यातून पूर्ण होऊ शकते. शरीरातील ग्लुकोच प्रमाणात ठेवण्याचे काम फायबर करते. ज्यामुळे माणसाची स्मरणशक्ती मजबूत राहते. कडधान्यांमध्ये बी जिवनसत्व असते. जे शरीराला आवश्यक प्रमाणात पोषण देते.

ओट्स:
मुलांच्या बौद्धीक (मेंदू) विकासासाठी आवश्यक उर्जेची पुर्तता ओट्स चांगल्या प्रकारे मिळवून देऊ शकतात. सकाळी सकाळी आवश्यक असलेली उर्जा मुलांना ओड्सच्या माध्यमातून मिळू शकते. ओट्समध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. तसेच ई, बी जिवनसत्वासह, पोटेशिएम आणि जिंकही ओड्समधून चांगल्या प्रमाणात मिळतात.

बीन्स:
बीन्समध्ये विविध प्रकारच्या हिरव्या कडधान्यांचा समावेश होतो. ज्यात राजमा, छोले, चवळी आणि हिरव्या शेंगा आदींचा समावेश होतो. बीन्समध्ये प्रोटीन, अधिक प्रमाणात कार्ब्स आणि उर्जा असते. फायबरसोबत खूप सारी जिवनसत्वे आणि खनिजही असते. खास करुन दुपारच्या भोजनात बीन्सचे चांगले प्रमाण मुलांसाठी अधिक प्रभावी ठरु शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: World Mental Health Day 2021 effective food for mental development of children.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x