22 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

२८ जुलै; आज जागतिक हेपॅटायटिस दिन: जाणून घ्या अधिक माहिती

hepatitis, Health, 28 July hepatitis Day

मुंबई : संपूर्ण जगाला धोकादायक असलेल्या हेपॅटायटिस या आजाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये फार कमी माहिती असते. २८ जुलै हा दिवस जागतिक हेपॅटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो. हेपॅटायटिस (यकृतदाह) हा आजार विशिष्ठ प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे ए, बी, सी, डी, आणि ई अशा पाच प्रकारात वर्गीकरण केले जाते. ए आणि ई या दोन विषाणूंमुळे होणार यकृतदाह प्रामुख्याने दूषित पाणी व अन्न यामुळे होतो.

त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हेपॅटायटिस बी व सी या आजाराचे विषाणू प्रामुख्याने दूषित रक्त, शस्त्रक्रिया, गोंदवून घेणे यामुळे पसरतात. भारतात हेपॅटायटिस बी मुले पाच ते सात कोटी लोक आणि हेपॅटायटिस सी मुले अडीच ते तीन कोटी लोक बाधित आहेत. या रोगाबद्दल माहिती नसल्याने व वेळीच निदान न झाल्याने अनेक लोक यामुळे मृत्युमुखी पडतात. हेपॅटायटिस सीच्या विरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. परंतु या आजारावर साधारण तीन महिने न चुकता उपचार करून या आजारावर मात करता येऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकार यांनी पुढाकार घेतल्यामुळे हेपॅटायटिसचे संपूर्ण निर्मूलन या मोहिमेकरिता मंजुरी दिली आहे. सन २०३० पर्यंत भारत या रोगापासून मुक्त व्हावा असा सामान्य हेतू या मोहिमेचा असून या बाबतीत अधिक काम सध्या या मोहिमेकडून करण्यात येत आहे. यावर कमी किमतीत लसीकरण उपलब्ध करून देणे व या आजाराबद्दल जनजागृती करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्धिष्ट आहे. त्यामूळे सध्याच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या आऱोग्याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. साधारण सहा महिन्यातून एकदा तरी पूर्ण शरीर तपासणी करणे गरजेचे आहे. जेणे करून आवश्यक असे उपचार आपल्या शरीराला मिळाल्यास शरीर कुठल्याही प्रकारच्या आजाराला बळी पडणार नाही. व आपल्याला निरोगी आयुष्य जगता येईल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x