22 November 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Ganesh Chaturthi 2022 | आज घरोघरी लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022 | आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.

श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना :
३१ ऑगस्टच्या दिवशी सकाळच्या वेळात म्हणजेच सकाळी ७.३० ते ९ या वेळेत गणेश पूजन करणं हे शुभ असेल. त्यानंतरची वेळ आहे सकाळी ११. ५ ते दुपारी १.३० या वेळेतही गणेशाची प्रतिष्ठापना करू शकता.

बाप्पाच्या पूजेचा विधी :
गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या जागी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तिथे एक चौरंग किंवा पाट ठेवावा. त्या पाटावर थोडं पाणी शिंपडून तो शुद्ध करून घ्यावा. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड अंथरावं आणि त्यावर अक्षता ठेवाव्यात. लाल कापड अंथरण्याआधी चौरंगावर किंवा पाटावर गंधाने स्वस्तिक काढावं. त्यानंतर गणपतीवर गंगाजल शिंपडून किंवा मंत्रोच्चार करून थोड्या प्रमाणात पाणी शिंपडावं.

मूर्तीचा प्रतिष्ठापना करताना दोन्ही बाजूला एक एक सुपारी रिद्धी आणि सिद्धी म्हणून ठेवावी. गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात विड्याची पाने पाच किंवा सात ठेवून त्यावर एक नारळ ठेवावा. हातात अक्षता आणि फुलं घेऊन बाप्पाचं ध्यान करावं. त्यानंतर ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा. गणेश अथर्वशीर्षाचे पठण करावे (किमान एकदा) मूर्ती पाटावर बसवल्यानंतर त्याची विधीवत पूजा करावी, त्यानंतर आरती करावी. त्यानंतर नैवैद्य म्हणून मोदक किंवा पेढे दाखवावेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ganesh Chaturthi 2022 puja muhurta check details 31 August 2022.

हॅशटॅग्स

#Ganesh Chaturthi 2022(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x