16 January 2025 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Numerology Horoscope | 14 सप्टेंबर, बुधवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुम्हाला यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागेल. कला आणि संगीतात विशेष रुची राहील. मोकळ्या वेळेत मित्रांशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. विरोधकांमध्ये तुमची भीती कायम राहील.
* लकी नंबर – 19
* शुभ रंग – लाल

मूलांक 2
घाईगडबडीतून कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होईल. आज नवे मित्र तुमच्याप्रती मैत्रीचा हात पुढे करतील. आईच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळेल.
* लकी नंबर – 1
* शुभ रंग – सफेद

मूलांक 3
आज कुटुंब, भावंडांसोबत आनंदात वेळ जाईल. विद्यार्थी, मालमत्ता, जमीन आणि संपत्तीची कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला राहील. बोलण्यावर नियंत्रण हवे .
* लकी नंबर – 6
* भाग्यशाली रंग – फिकट निळा

मूलांक 4
आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. प्रेमात काहीशी निराशा येऊ शकते. आपल्या गोड बोलण्याने परिस्थिती हाताळाल. भागीदारीसह नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
* लकी नंबर – 11
* शुभ रंग – नारंगी

मूलांक 5
आज तुम्ही उत्साही व्हाल. अतिरिक्त कामांमध्ये मन अधिक व्यस्त राहील. जे सरकारी काम बंद पडले होते ते आज पूर्ण होणार आहे.
* लकी नंबर – 3
* शुभ रंग : पांढरा

मूलांक 6
आज तुमचे आरोग्य थोडे नाजूक असेल. कामाच्या ठिकाणीही त्याचा प्रभाव पडू शकतो. मात्र, आपण आपल्या कामात लक्ष केंद्रित कराल.
* लकी नंबर – 4
* लकी कलर – ग्रे

मूलांक 7
घराच्या सजावटीसाठी आज जास्त खर्च होऊ शकतो. कौटुंबिक दृष्टीने वेळ अनुकूल आहे. जमीन, घर इत्यादींशी संबंधित उत्पन्नाचे स्रोत कमी होऊ शकतात. विवाहयोग्य असाल तर लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
* लकी नंबर – 9
* शुभ रंग : फिकट हिरवा

मूलांक 8
आज तुम्ही तुमच्या भूतकाळाचा विचार कराल, त्याचा तुम्हाला फायदा होणार नसला तरी आठवणी ताज्या होतील. नवीन प्रेम संबंध तयार होतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
* लकी नंबर – 14
* शुभ रंग – गुलाबी

मूलांक 9
प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज शेअर बाजारात पैसे गुंतवू नका. राजकीय कार्यातील प्रयत्नांना यश मिळू शकेल.
* लकी नंबर – 4
* भाग्यशाली रंग – हिरवा

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 14 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x