16 January 2025 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Numerology Horoscope | 23 सप्टेंबर, शुक्रवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
धन लाभ आणि परदेश प्रवास करता येईल. व्यवसायातील विस्तारासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्ही लोकांवर सहज प्रभाव पाडू शकता.
* लकी नंबर – 12
* शुभ रंग : पिवळा

मूलांक 2
आज आपल्या कामात अनेक अडथळे येतील. नोकरीची चिंता सतावू शकते. आपल्या विरोधकापासून सावध राहा. आपल्याला जे मिळवायचे होते ते मिळविण्यात विलंब होऊ शकतो.
* लकी नंबर – 10
* शुभ रंग: सिल्वर

मूलांक 3
तुम्ही खूप प्रभावशाली लोकांना भेटू शकता. जोडीदाराशी काही वाद होऊ शकतात. व्यवसायात नवी उमेद राहील, प्रगतीची शक्यता आहे. आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतील.
* लकी नंबर – 24
* शुभ रंग – निळा

मूलांक 4
आज आपण सरकारी कामे किंवा कोर्टाशी संबंधित बाबींवर विजय मिळवू शकता. जीवन साथीदाराला प्रत्येक कामात साथ मिळेल. भावनिक कौटुंबिक संबंधांची काळजी घ्या.
* लकी नंबर – 11
* शुभ रंग: नारंगी

मूलांक 5
आज अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. आपल्या प्रयत्नांचे फळ मिळेल. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. कुटुंबासाठी गुंतवणूक कराल. घरासाठी काही महागड्या वस्तू खरेदी करू शकता. अचानक खर्च मोठा होऊ शकतो.
* लकी नंबर – 15
* लकी कलर- ग्रीन

मूलांक- 6
व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. मित्र मदत करतील. थोडा धीर धरा. विचारपूर्वक कोणतेही पाऊल उचला.
* लकी नंबर – 4
* शुभ रंग : लाल रंग

मूलांक- 7
आर्थिकदृष्ट्या दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. पती-पत्नीमधील आपसातील मतभेद आणि विसंवाद वाढू शकतो. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या, अन्यथा पोट खराब होऊ शकते. कुटुंबात खर्चाबाबत वाद होऊ शकतो.
* लकी नंबर – 34
* शुभ रंग : पिवळा

मूलांक 8
व्यापार क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा खर्च जास्त असेल. भावनिक समस्या त्रासदायक ठरू शकतात. विवाहित दाम्पत्य नव्या वादात अडकू शकतात. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ आहे.
* लकी नंबर – 20
* शुभ रंग : निळा

मूलांक 9
आज बँक बॅलन्स वाढेल. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी दिवस उत्तम आहे. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.
* लकी नंबर – 4
* शुभ रंग – सफेद

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 23 September 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(532)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x