17 April 2025 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Shukra-Budh Rashi Parivartan | महाशिवरात्रीपूर्वी शुक्र-बुध राशी परिवर्तन या 3 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार, तुमची राशी?

Shukra-Budh Rashi Parivartan

Shukra-Budh Rashi Parivartan | शुक्र आणि बुध काही दिवसात बदलणार आहेत. 7 मार्च रोजी बुध कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे, तर शुक्र या दिवशी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. बुधाचे गोचर होताच राहू आणि बुधयांची युती होईल. त्याचबरोबर शुक्राचे संक्रमण म्हणून शनी आणि शुक्राची युती तयार होईल.

8 मार्चला महाशिवरात्री आहे. अशा तऱ्हेने शिवरात्रीपूर्वी या ग्रहांची बदलती हालचाल काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी बुध आणि शुक्राच्या बदलामुळे कोणत्या राशींना मिळू शकतो जबरदस्त फायदा.

कन्या राशी
महाशिवरात्रीच्या 1 दिवस अगोदर बुध आणि शुक्राची बदलती हालचाल कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. आरोग्याला धोका नसला तरी आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थितीत पूर्वीच्या तुलनेत सुधारणा दिसू शकते. उपासनेत मन गुंतवून ठेवणे चांगले राहील. पैसा मिळकतीचे नवे मार्ग निर्माण होण्याचा योग आहे. तसेच एखादा लहानसा उद्योग सुरु करण्यासाठी चांगला काळ आहे.

मिथुन राशी
महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर बुध आणि शुक्राचे संक्रमण काही मिथुन राशीच्या लोकांना श्रीमंत बनवू शकते. उद्योगपतींसाठी हा काळ चांगला मानला जात आहे. पैसा येईल आणि तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकाल. कुटुंबासमवेत प्रवासाची योजना आखू शकाल. गुंतवणूक म्हणूनही हा काळ शुभ मानला जातो. कुटुंबात पैसा येण्यासाठी शुभं काळ असल्याने त्यासाठी नवे स्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थिती बदलण्याची सुरुवात होऊ शकते.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राचे संक्रमण लाभदायक मानले जाते. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. स्वत:ला तणावमुक्त आणि आनंदी ठेवण्यासाठी निसर्गात वेळ घालवा. आरोग्याची काळजी घ्या. पैसा मिळकत वाढण्यासाठी महत्वाचं असतं ते पैसा येण्याचे अनेक स्रोत असणे. तेच या काळात घडू शकतं आणि पैशाची अवाक वाढू शकते.

News Title : Shukra-Budh Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 04 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shukra-Budh Rashi Parivartan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या