24 December 2024 11:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Shukra Rashi Parivartan | 2 ऑक्टोबरपासून शुक्र राशी परिवर्तन बदलणार 'या' 3 राशींचे नशीब, सुवर्णकाळ असेल, तुमची राशी आहे यामध्ये?

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, संपत्ती, ऐश्वर्य आणि ऐशोआरामाचा कारक मानला गेला आहे. शुक्र कोणत्याही राशीत सुमारे २३ दिवस राहतो आणि नंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या शुक्र कर्क राशीत भ्रमण करीत असून २ ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल.

सूर्याच्या सिंह राशीत शुक्राचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शुक्र संक्रमणाच्या प्रभावामुळे अनेक राशीच्या लोकांना शुक्राच्या कृपेने आर्थिक लाभ तसेच करिअरची प्रगती मिळू शकते. शुक्र संक्रमणाच्या प्रभावामुळे कोणत्या राशींचे आयुष्य बदलेल जाणून घ्या.

मेष राशी
मेष राशीसाठी हे संक्रमण तुमच्या राशीच्या पाचव्या भावात होईल. या काळात कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात, परंतु खर्चही वाढू शकतो. कामाबद्दल बोलायचे झाले तर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात तुम्ही लांबचा प्रवास करू शकता.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांना शुक्र संक्रमणाच्या प्रभावातून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे कारण शुक्र नवव्या स्थानात प्रवेश करीत आहे. या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. सिंह राशीत शुक्राच्या संक्रमण काळात करिअरशी संबंधित नवीन संधी ही तुम्हाला मिळतील.

सिंह राशी
शुक्राचे सिंह राशीतील संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिषीय गणनेनुसार हा काळ तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. हा खूप भाग्याचा काळ आहे, कारण शुक्र आपल्या पहिल्या भावात स्थित आहे. वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. गुंतवणुकीवर भरपूर परतावा मिळेल. व्यापाऱ्यांनाही या काळात नफा होईल.

News Title : Shukra Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 26 September 2023.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x