26 December 2024 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर कर्नाटक जेडीएसच्या 100 हून अधिक मोठ्या नेत्यांचा राजीनामा, भाजप सर्वांना राजकीय पनवती वाटतोय?

After BJP-JDS Alliance

Karnataka JDS Alliance with BJP | देवेगौडा यांचा पक्ष जनता दल सेक्युलर (जेडीएस) साठी कर्नाटकात भारतीय जनता पक्षाशी युती करणे महागात पडत आहे. अधिकृत युती जाहीर होताच आतापर्यंत शेकडो नेते आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे. त्यात अल्पसंख्याक समाजातील नेते देखील आहेत. आता म्हैसूर शहरातील नरसिंहराजा विधानसभा मतदारसंघातील अब्दुल खादर यांच्यासह १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जेडीएसचे राजीनामे दिले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाबाजूला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरातील मुस्लिम समाजाला लक्ष्य करत आहेत. ते द्वेषाचे राजकारण करत आहेत. तसेच काहीच संबंध नसताना विनाकारण मुस्लीम समाजातील लोकांना लक्ष करत आहेत. तसेच मुस्लिमांनी मतदान करू नये, असे भाजपचे नेते उघडपणे धमक्या देतं आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकात जेडीएसची भाजपसोबत युती केल्याने मध्य संख्येने JDS पदाधिकारी पक्ष सोडत आहेत. यामध्ये अनेक JDS हिंदू नेत्यांचा देखील समावेश आहे हे विशेष म्हणावे लागेल. भाजप ज्या पक्षासोबत युती करतो त्याच सहकारी पक्षाला भविष्यात संपवून तो पक्ष स्वतःच्या ताब्यात घेण्याची योजना आखतो असा इतिहास असताना JDS ने युती केल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढला आहे.

जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे, पण भाजपबद्दल नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे. राजीनामा देणाऱ्या जेडीएसच्या अल्पसंख्याक नेत्यांनी जेडीएस अध्यक्ष सीएम इब्राहिम यांना तात्काळ राजीनामा देण्याची विनंती केली.

पक्षाचे प्रवक्ते, प्रदेश उपाध्यक्षांनीही राजीनामा दिला
जेडीएसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष सय्यद शफीउल्ला साहेब यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जेडीएसच्या माजी प्रवक्त्या यूटी फरजाना अशरफ यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. जेडीएस मीडिया सेलचे प्रमुख श्रीकांत गौडा यांना लिहिलेल्या पत्रात फरजाना यांनी म्हटले आहे की, वैचारिक मतभेदांमुळे आपण पक्षाच्या प्रवक्त्यापदाचा राजीनामा देत आहे.

जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केली होती. कर्नाटकात जेडीएस हा बराच काळ तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. येथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात आमनेसामने लढत होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसने भाजपला सत्तेतून हाकलून लावले होते. तसेच JDS पक्षाची देखील दयनीय अवस्था झाली आहे.

News Title : After BJP-JDS Alliance more than 100 leaders resigned from JDS 28 September 2023.

हॅशटॅग्स

#After BJP-JDS Alliance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x