16 April 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

मला 100% खात्री आहे! पुलवामा हल्ला मोदींनी निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी केलेला राजकीय स्टंट होता, CRPF शहीद जवनाच्या वडिलांचा गंभीर आरोप

Satyapal Malik

Politics Behind Pulwama Attack Exposed | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकत्याच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या धक्कादायक खुलाशाच्या पार्श्वभूमीवर २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शहीद जवानांपैकी भगीरथचे वडील परशुराम यांनी द वायरशी बोलताना सांगितले की, 14 फेब्रुवारी 2019 च्या दुर्दैवी दिवसापासून त्यांना अनेक प्रश्न सतावत आहेत. जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांच्या खुलाशांमुळे पुलवामा हल्ला हा मोदी सरकारचा मोठा राजकीय स्टंट होता, या विश्वासाला पुष्टी मिळाली आहे. परशुराम पुढे म्हणतात, “मला 100 टक्के विश्वास आहे की हे मोदी सरकारने सत्तेत राहण्यासाठी केले गेले आहे आणि मोदी सरकारने खुर्ची मिळवण्यासाठी (लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी) हे सर्व रचले असा गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.

शहीद जवान भगीरथचे वडील परशुराम
घटनेच्या दिवशी काय घडले हे सांगताना त्यांनी सुमारे २०० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन कुठूनही बाहेर येऊन जवानांना घेऊन जाणारी बस कशी उडवू शकते? असा सवाल केला. शहीद जवान भगीरथचे वडील परशुराम यांनी संतापाने विचारले की, “त्यावेळी पंतप्रधान कुठे होते? ते झोपले होते का?”. दुसरीकडे, मलिक यांनी करण थापर यांची मुलाखत घेतल्यानंतर विरोधकांनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर देण्याची मागणी पुन्हा सुरू केली आहे.

शहीद जवान जीतराम यांचे बंधू विक्रम
पुलवामा दहशतवादी हल्ला मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आणि निष्काळजीपणामुळेच झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने जवानांना एअरलिफ्ट केले असते तर जीव वाचू शकला असता, अशी टीका मलिक यांनी केली होती. आपल्या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे जीव गमवावा लागला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्यावर आपल्याला गप्प राहण्यास सांगण्यात आले होते, असेही माजी राज्यपालांनी म्हटले होते. मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते, जिथे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होती. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जीतराम यांचे बंधू विक्रम आपल्या भावाच्या अकाली मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. मृत्यूसमयी त्यांचा शहीद भाऊ ३० वर्षांचा होता.

शहीद जीतराम यांचे बंधू विक्रम ‘द वायरशी’ बोलताना म्हणाले की, भावाच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब अजूनही दु:खी आहे. ज्यांनी कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे त्यांनाच माहित आहे की कसे वाटते,” ते म्हणाले. मात्र, ते पुढे म्हणाले की, घटनेच्या वेळीच सत्यपाल मलिक यांनी बोलायला हवे होते.

शहीद जवान रोहिताशचे कुटुंब
अजून एक शहीद जवान रोहिताशचे कुटुंबही तितकेच व्यथित झाले असून या घटनेनंतर अनेक वर्षे उलटूनही ते दु:खात जगत आहेत. मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्या भावाचे जे झाले ते ऐकून इतर सैनिकांच्या जीवाची चिंता वाटते, असे रोहिताशचा भाऊ जितेंद्र सांगतो. जितेंद्र यांनी म्हटले की, ‘त्या सैनिकांसोबत जे घडलं ते दुसऱ्या कुणासोबत ही घडू नये. केंद्रीय गृहमंत्रालयाने या विमानाची सैन्य वाहून नेण्याची विनंती नाकारायला नको होती. सैनिकांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सत्यपाल मलिक हे असे व्यक्ती आहेत की ते कुणालाही घाबरत नाहीत आणि ते जे काही बोलतात ते बरोबर आहे, असा विश्वास शहीद जवानाच्या भावाने व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: After Jammu and Kashmir former governor Satyapal Malik revelations CRPF Jawans killed in Pulwama.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Satyapal Malik(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या