22 November 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Agnipath Scheme | मोदी सरकार अग्निपथ योजनेवर ठाम | उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास संधी मिळणार नाही

Agnipath Scheme

Agnipath Scheme | केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीनं देण्यात आली. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही. सेनेच्या तीनही सेना दलांच्या वतीनं आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.

1 जुलै रोजी अधिसूचना जारी होणार :
अग्निवीरांच्या भरतीसाठी 1 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर इच्छुक विद्यार्थी अर्ज करू शकतील. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नोकरभरतीची पहिली फेरी सुरू होईल. यादरम्यान शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार त्यांना वेगवेगळ्या विभागात पाठवले जाईल. प्रथम 25 हजार अग्निवीरांची भरती होणार आहे. अग्निवीरांचा दुसरा स्लॉट फेब्रुवारीमध्ये येईल, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध :
सैन्याने अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही हे स्पष्ट केले असले तरी देशभरातून अग्निपथ योजनेला होणार विरोध अजूनही मावळेला नाही. देशभरात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनं झाली आहे. अनेक ठिकाणी मोठी हिंसा झाली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षही या आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे देशातलं राजकारणही सध्या याच योजनेवरून पेटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Agnipath Scheme will not be withdrawn said Modi government check details 19 June 2022.

हॅशटॅग्स

#Agnipath Scheme(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x