18 November 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

मुंबईच्या समुद्रातील विशाल वांद्रे-वरळी सी लिंकचं उदघाटन साध्या पद्धतीने | गुजरातमधील नदीवरील 2 पिलर फूट ओव्हरब्रिजचा इव्हेन्ट असा रंगवला

Ahmadabad Atal Bridge

Ahmadabad Atal Bridge | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (27 ऑगस्ट) गुजरातमधील अहमदाबादमध्ये साबरमती नदीवरील अटल पुलाचे उद्घाटन केले. साबरमती रिव्हरफ्रंट येथे आयोजित खादी उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी एका सभेला संबोधित केले. याच ठिकाणाहून पंतप्रधानांनी फूट ओव्हर ब्रीजचा शुभारंभ केला. त्याचबरोबर उद्घाटनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या पुलाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले- “अटल पूल प्रेक्षणीय दिसत नाही का!” साबरमती नदीवर बांधण्यात आलेल्या फूट ओव्हरब्रिजबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद शहरातील साबरमती नदीवरील एकमेव पादचारी अटल पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पालिकेने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे. आकर्षक रचना व एलईडी प्रकाशयोजना असलेला हा पूल सुमारे ३०० मीटर लांब व मध्यभागी १४ मीटर रुंद असून नदीकाठच्या पश्चिम टोकावरील फुलांची बाग आणि पूर्वेकडील कला व संस्कृती केंद्र यांना जोडतो. बांधकामानुसार हा फूट ओव्हरब्रिज लोखंडी असून त्याला नदी पात्रात केवळ दोनच पिलर सपोर्ट असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र इव्हेंटला मोठं स्वरूप देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.

अटल पुलाबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी जाणून घ्या :
अटल पुलाचे उद् घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अटल पूल केवळ साबरमती नदीच्या दोन काठांना जोडणारा नाही तर डिझाइन आणि नाविन्यपूर्णतेतही अभूतपूर्व आहे.” ‘स्वातंत्र्य चळवळीची ताकद बनलेल्या खादीच्या एका धाग्याने गुलामगिरीच्या साखळ्या मोडल्या, हा इतिहास साक्षीदार आहे. खादीचा हाच धागा विकसित भारताचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणास्रोत बनू शकतो.

मुंबईच्या अरबी समुद्रात वांद्रे – वरळी पूल कोणाच्या काळात बांधला?
दरम्यान की वर्ड सर्चद्वारे वांद्रे – वरळी हा पुल UPA च्या काळात बांधल्याचं समजलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ३० जून २००९ रोजी या पुलाचं उदघाटन केलं होतं. या उदघाटनाविषयी काही माध्यमांनी वृत्त ही दिलं होतं. न्यूज एक्स ने या उदघाटनादरम्यानचा एक व्हिडिओ ३० जून २००९ रोजी अपलोड केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ahmadabad Atal Bridge inauguration by PM Narendra Modi check details 28 August 2022.

हॅशटॅग्स

#Ahmadabad Atal Bridge(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x