22 February 2025 8:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

शिंद गटातून 'ठाकरे' वजा केल्यावर मतं 5% टक्क्यावर आली, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठे पवार आणि काँग्रेस वजा केल्यास मतं 0.5 होतील

Ajit Pawar

NCP Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारची मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात भीष्म पितामह अशी प्रतिष्ठा असलेल्या शरद पवार यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे पुतणे अजित पवार 9 आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. काल ते आमदारांसह अचानक राज्यपाल भवनात पोहोचले आणि सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या आमदारांवर कारवाईची मागणी करत राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षांच्या दारात धाव घेतली आहे.

जयंत पाटील यांचे कारवाईचे संकेत

जयंत पाटील म्हणतात की, शपथ घेतलेल्या आमदारांना पक्ष बदलण्याचा आणि मंत्री होण्याचा अधिकार नाही. त्यांनी राष्ट्रवादीविरोधात बंड केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात येऊ शकते. आमदारांची संख्या कितीही असली तरी पक्षाने नेमलेला व्हिप सोबत आमदार गेले नाही तर त्यांच्या सांगण्यावरून या लोकांना अपात्र ठरविले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात म्हटले आहे याची जयंत पाटील यांनी आठवण करून दिली आहे.

शिंदे गटाचे एनडीएतील स्थान घसरले

अजित पवार यांच्या एनडीए प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांचे राजकीय स्थान कमी झाल्याची चर्चा आहे. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे १०५ आमदार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४० आमदार आहेत. ४० आमदार असलेले शिंदे मुख्यमंत्री राहिले. आपल्याकडे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे आणि पवार हे दोघेही एनडीएत समान भागीदार झाले आहेत. मात्र पुढे सुप्रीम कोर्टाच्या निकालामुले मुख्यमंत्री पद गेल्यावर शिंदे गटाची राजकीय अवस्था अत्यंत दयनीय होईल असं म्हटलं जातंय.

मंत्री पद होण्याच्या प्रतीक्षेत शिंदे गट पण झालं उलटंच

एकनाथ शिंदे सरकारला तीन दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले असून शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यात शिंदे यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होईल, अशी चर्चा नुकतीच मुंबईपासून दिल्लीपर्यंत झाली होती, पण त्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रवेशाने शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या आशा धुळीस मिळाल्याचे समजलं जातंय. याबाबत शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचे वृत्त आहे. आता मंत्रिपद सोडा, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल का याची देखील शाश्वती देता येणार नाही.

शिंदे यांच्या शिवसेनेला गटाला केवळ ५.५ टक्के मते मिळतील – सर्वेक्षण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता प्रसिद्ध कंपनीच्या सर्वेक्षणाच्या निकालातून दिसून आली होती. तेव्हा अजित पवारांचा गट सोबत नव्हता. आता त्यातही वाटेकरी आल्याने शिंदेंच्या एकूण मतांचा आकडा अजून घसरेल असं म्हटलं जातंय. त्यावेळेची एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेला केवळ ५.५ टक्के मते मिळू शकतात असं त्या सर्व्हेत म्हटले होते. शिंदे यांच्यापासून ‘ठाकरे’ वजा केल्यावर त्यांच्या मतं किती घातली आहेत याचा प्रत्यय आला होता.

अजित पवारांपासून ‘शरद पवार आणि काँग्रेस’ वजा केल्यास मतं ०.५ वर येतील

जी अवस्था एकनाथ शिंदे यांच्या मतांची झाली आहे, तशीच किंवा त्याहून अधिक बिकट अवस्था अजित पवार यांची होऊ शकते जर त्यांच्या राजकारणातून शरद पवार आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार मतं वजा केल्यास अजित पवार समर्थक देखील मोठ्या प्रमाणावर पराभूत होतील असं राजकीय तज्ज्ञांनी मतं व्यक्त केले आहे. तसेच भाजपसबत गेल्याने अजित पवारांचे समर्थक आमदार-खासदार अल्पसंख्यांक आणि बहुजनांच्या मतांना देखील गमावतील असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी आता राजकीय गणिताची स्थिती शिंदे यांच्याहून बिकट असेल असे संकेत मिळत आहेत.

News Title : Ajit Pawar joins BJP alliance check details on 02 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x