19 April 2025 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

ईडीच्या चक्रव्युहात अडकलेला राजकीय 'अर्जुन' शिंदे गटात | भ्रष्टाचाऱ्यांसाठी शिंदे गट म्हणजे सुरक्षा कवच झालंय का?

Arujun Khotkar

Arjun Khotkar | शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदेंच्या गटात सामील झाले आहे. अशातच जालन्याचे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर सुद्धा शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा रंगली आहे. अर्जुन खोतकर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.

अर्जुन खोतकर सध्या दिल्लीत :
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सध्या दिल्लीत दाखल झाले आहे. मागील आठवड्याभरापासून ते दिल्लीत मुक्कामी आहे. या आठवड्यभरात त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. भाजपचे नेत्यांच्याही खोतकरांनी भेटी घेतल्या आहेत. आज दुपारी खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सुद्धा पोहोचले आहे.

दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई :
दरम्यान, यावेळी भेटीच्या वेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहे.

ED रडारवर होते :
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांप्रमाणेच अर्जुन खोतकर हे देखील सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) रडारवर होते. मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या असलेल्या जालना सहकारी साखर कारखान्याच्या लिलावात कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप होता. थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. ४२ कोटी ३१ लाख रुपयांत हा विक्रीचा व्यवहार झाला. मात्र, कारखान्यातील मालमत्तेची किंमत प्रत्यक्षात जवळपास दुप्पट असल्याचं ईडीच्या स्वतंत्र चौकशीत समोर आलं होतं. त्यामुळं या कारखान्यावर जप्ती आली होती. अर्जुन खोतकर यांचीही या प्रकरणी चौकशी सुरू होती. उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा त्यांचा निर्णय यातून सुटका करून घेण्यासाठीच झाल्याचं बोललं जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Arujun Khotkar meet CM Eknath Shinde in Delhi check details 25 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Arjun Khotkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या