20 April 2025 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Basti Rape Case | संतापजनक! 12 वर्षाच्या अल्पवयीन हिंदू मुलीला घरी बोलावून 3 भाजप कार्यकर्त्यांकडून क्रूर गँगरेप! रक्तस्त्रावाने मुलीचा मृत्यू

Highlights:

  • Basti Rape Case 
  • एका शाळेजवळ मुलीचा मृतदेह फेकण्यात आला
  • आरोपीचे भाजप पक्षाशी संबंध
  • रक्ताने माखलेले बेडशीट आणि काही कपडे सापडले
Basti Rape Case

Basti Rape Case | उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. सामूहिक बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

एका शाळेजवळ मुलीचा मृतदेह फेकण्यात आला

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 5 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. ही अल्पवयीन मुलगी सायंकाळी बाजारातून भाजी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी कछिया-बिऊपूर रस्त्यावरील एका शाळेजवळ मुलीचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

आरोपीचे भाजप पक्षाशी संबंध

अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बिरूपूर येथील रहिवासी मोनू निषाद यांनी गावातील एका व्यक्तीला मृतदेहाची माहिती दिली होती. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात मोनू निषाद, राजन निषाद आणि कुंदन सिंह यांच्यावर मुलीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. हे तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, कुंदन सिंह हे भाजप किसान मोर्चा गौर मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तर अन्य दोन आरोपी हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांच्या चौकशीत मोनू निषाद याने सांगितले की, तो पीडितेला गेल्या सहा-सात महिन्यांपासून ओळखत होता. ५ जून रोजी सायंकाळी त्याने तिला फोन करून भेटण्यास सांगितले. ज्यानंतर तो ठरल्याप्रमाणे अल्पवयीन मुलीला भाजप किसान मोर्चा गौर मंडळाचे उपाध्यक्ष कुंदन सिंगच्या घरी घेऊन गेला. जिथे तिच्यावर बलात्कार झाला. अत्यंत क्रूरपणे या तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने जास्त रक्तस्त्राव झाला आणि त्यात मुलीचा मृत्यू झाला अशी माहिती पुढे आली आहे. पुढे संतापजनक म्हणजे या भाजप संबंधित आरोपींनी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून पसार झाले.

रक्ताने माखलेले बेडशीट आणि काही कपडे सापडले

आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी या घटनेशी संबंधित अनेक पुरावेही गोळा केले. पोलिसांनी कुंदन सिंग यांच्या घरातून कपड्यांच्या ढिगाऱ्यातून रक्ताने माखलेली चादर आणि काही कपडे जप्त केले. पोलिस तपास आणि शवविच्छेदनात बलात्काराची पुष्टी झाली आहे. जास्त रक्तस्त्राव आणि न्यूरो इजा झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला हे देखील स्पष्ट झालं आहे.

सध्या पोलिसांनी या प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर गावातील लोक आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. बिरोपूर चौकात लोकांनी रास्ता रोको करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर भाजप विरोधात संतापाची लाट पसरल्याचे वृत्त आहे.

News Title : Basti Rape Case gangrape with 12 year old girl BJP worker called her at home check details on 07 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Basti Rape Case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या