17 April 2025 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

मुख्यमंत्री नितीश कुमार गरजले, थेट मोदींना इशारा | म्हणाले 2014 वाले 2024 मध्ये राहतील तेव्हा ना, विरोधी पक्षांनी मनाने एकवटावं

Bihar Political Crisis

Bihar Political Crisis | बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जेडीयू नेते नितीश कुमार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना मनापासून एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, जे लोक 2014 मध्ये (नरेंद्र मोदी) आले होते ते 2024 (लोकसभा निवडणुकीत) राहतील तेव्हा ना, त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे आणि एकजुटीने एकत्र यावं, असं आवाहन नितीश कुमार यांनी केलं आहे. विरोध संपेल, असे ज्यांना वाटते, तर ते चुकीचे आहे. पुढे खूप काही होणार आहे. आता आम्हीही त्यांच्या विरोधात आलो आहोत.

भाजपशी युती का तोडली, याचा नितीश यांनी खुलासा केला :
भाजपसोबतची युती तोडण्याबाबत नितीश कुमार म्हणाले की, त्यांच्या पक्षाशी बऱ्याच काळापासून दुजाभाव केला जात होता. 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही जदयूच्या बहुतांश आमदार आणि नेत्यांनी भाजपची साथ सोडावी असं म्हटलं होतं. तेव्हापासून पक्षातील सर्वच जण एनडीएपासून फारकत घेण्याच्या विचारात होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी युती तोडली अशी माहिती दिली.

मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत :
शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भविष्यातील रणनितीबाबत खुलासा केला. 2024 मध्ये विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का, असे विचारले असता त्यांनी त्याचा स्पष्ट इन्कार केला. मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, आमचा कोणत्याही पदासाठी दावा नाही. पण २०१४ मध्ये आलेल्यांना २०२४ नंतर राहता येईल की नाही? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bihar Political Crisis CM Nitish Kumar alert to PM Narendra Modi for 2024 Loksabha Election 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bihar Political Crisis(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या