Bihar Politics | सुशांत सिंग प्रकरणानंतर आता लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या आडून धार्मिक द्वेष पेटवण्याची भाजपची खेळी?
Bihar Politics Baba Dhirendra Shastri | उन्हाळ्याचे कडक चटके लागत असताना देखील मोठ्या प्रमाणात टेम्पो, ट्रॅक्टर, बस, दुचाकी, चारचाकी गाडी पकडून पाटण्यापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या नौबतपूर येथील तारेत पाली मठात पोहोचलेल्या बाबा बागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे मोठे नेते शक्ती प्रदर्शन करत पोहोचले.
त्यांच्या या बिहारच्या दौऱ्यात स्थानिक भाजपला जणू रसद पुरविण्याचे आदेशच देण्यात आले असावेत असं स्थानिक पत्रकारांनी एकूण चित्र पाहिल्यावर तर्क लावले आहेत. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हातील धीरेंद्र शास्त्री हे यांना लोकसभेपूर्वी भाजपसाठी वातावरण निर्मिती करण्याची जवाबदारी देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
ते पाच दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. शनिवारपासून येथे सुरू झालेल्या त्यांच्या हनुमंत पठण कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. त्यांच्या या कार्यक्रमाला दररोज लाखो लोक पोहोचत आहेत आणि त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात आसपास वावर दिसत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंडित धीरेंद्र शास्त्री यांची पूजा करणारे त्यांच्यात दैवी शक्ती आहे असे म्हणतात, तर इतर लोक, विशेषत: त्यांचे टीकाकार याला अंधश्रद्धा म्हणतात. खरं तर नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता. स्वतःला चमत्कारी म्हणताना त्यांनी महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांचा देखील महाराष्ट्रात येऊन अपमान केला होता. त्यानंतर त्यांच्यावर राजकीय आणि सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली होती. सध्या त्यांनी अचानक बिहारवर फोकस केल्याचं दिसू लागलय. भाजपच्या खासदारांपासून ते केंद्रातील मंत्र्यांपर्यंत त्यांना उघडपणे त्यांना पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांनी एकत्रितपणे मंचावर त्यांची आज आरती केली.
बाबा बागेश्वर यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान भाजप नेते मनोज तिवारी आणि गिरीराज सिंह सर्वात पुढे दिसले. काल बिहारमध्ये ते म्हणाले होते की, हिंदु राष्ट्राची सुरुवात बिहारमधून होईल. यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुद्धा घटनेचा आधार घेत कायद्यांचे भाष्य करत प्रतिक्रिया दिली. राजद नेते आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव म्हणाले की, मी त्यांना बाबा मानत नाही. आमचं काम लोकांची सेवा करणं आहे, कोणत्याही बाबांच्या सेवेला आम्ही सरकार म्हणून बांधील नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Bihar Politics upcoming loksabha election 2024 heck details on 18 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे