18 November 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

भाजपकडून हिंदू देवतांचा अपमान, प्रभू हनुमानाच्या मूर्तीसमोर बॉडीबिल्डर्स महिलांची बिकीनीत पोजिंग, घृणास्पद स्पर्धा

Women Bodybuilders Posing in front of Hanuman ji Statue | होळीपूर्वी राजकीय वातावरणाला वेगळाच रंग आला आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेवरून राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. यामागचं कारण म्हणजे व्हायरल झालेला व्हिडिओ, ज्यात स्टेजवर ठेवलेल्या प्रभू हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला बॉडीबिल्डर्स बिकीनी घालून पोज देत आहेत. ज्यावरून बराच गदारोळ सुरू आहे. हा व्हिडिओ राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यावरून भाजपवर हल्लाबोल करत असून चौकशीची मागणीही करत आहेत.

सपा आणि विरोधीपक्षांची जोरदार टीका
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ ट्विट करून भाजपवर हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, ‘भाजपने धार्मिक मूर्तींचा अपमान करू नये. दरम्यान, काँग्रेसने या संपूर्ण घटनेवर आक्षेप घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रतलाम येथे ४ व ५ मार्च रोजी १३ वी मिस्टर ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली गंगाजल फवारणी
मध्य प्रदेशातील रतलाम येथे भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेच्या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गंगाजल शिंपडले आहे. त्याचवेळी काँग्रेस नेत्यांनी शुद्धीनंतर त्या जगावर हनुमान चालिसाचे पठण केले. काँग्रेस नेत्यांनी भाजपवर अभद्रता पसरवल्याचा आरोप केला आणि बजरंग बली यात सहभागी असलेल्यांना शिक्षा देईल, असे म्हटले आहे. या कार्यक्रमात भाजपचे काही नेते सहभागी झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपने अजब प्रत्युत्तर दिले
काँग्रेसच्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचं म्हणणं आहे की, काँग्रेस हा असा पक्ष आहे, ज्याला महिलांना खेळात पुढे जाताना पाहायचं नाही. कुस्ती, जिम्नॅस्टिक्स, जलतरण यांसारख्या स्पर्धांमध्ये महिलांना सहभागी होताना काँग्रेस पुरुषपाहू शकत नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP exposed over women bodybuilders posing in front of Hanuman ji statue video trending check details on 07 March 2023.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x