22 February 2025 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

भाजपमध्ये धाकधूक! पक्षाची सदस्य संख्या 18 कोटी | तिरंगा सेल्फी पोर्टलकडे 15 कोटी सदस्यांची सुद्धा पाठ, भावनिक लाट ओसरल्याने चिंतेत

BJP Har Ghar Tiranga

BREAKING NEWS | ऑगस्ट २०१९ प्रमाणे भारतीय जनता पक्षच्या एकूण सदस्यांची संख्या १८ कोटींवर आहे, अशी माहिती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वतः दिल्लीत जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जुलै २०१९ मध्ये वाराणसीयेथून सुरू केलेल्या पक्षाच्या सदस्यता मोहिमेला संपूर्ण भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला, असे नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र सध्याच्या डेटाप्रमाणे भाजपमध्ये स्वस्वस्थता पसरली आहे असं खात्रीलायक वृत्त आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये दिल्लीत बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. भाजपच्या आयटी सेलने केलेल्या अनॅलिटीक्स रिपोर्टमध्ये जी आकडेवारी समोर आली आहे त्यातून भाजपाची झोप उडाली आहे.

वास्तविक, भाजपचे लोकं आपल्या पक्षासोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत किती भावनिक दृष्ट्या जोडली गेली आहेत, याचा आढावा घेण्यासाठी १० मे २०२२ मध्ये harghartiranga.com नावाने वेबसाईट बुक केली होती. त्याअनुषंगाने भाजपच्या आयटी सेलने नुकत्याच पार पडलेल्या १५ ऑगस्टच्या अनुषंगाने मोदींसमोर हे कॅम्पेन ठेवून लोकांच्या भावनिक कनेक्शनचा आढावा घेण्याची योजना आखली होती. त्यानुसार, १० मे २०२२ रोजी बुक करण्यात आलेल्या डोमेनवर आधीच काम करण्यात आलं होतं. वास्तविक सरकारीशी संबंधित वेबसाईट डोमेन्स हे .GOV (डॉट जीओव्ही) एक्सटेन्शनने असतात तरी हा डोमेन डॉटकॉम’ने बुक करण्यात आला होता यावर लोकांना १५ ऑगस्टचे सेल्फी अपलोड करायला सांगून कॅम्पेन राबविण्यात आलं आणि हा डेटा ट्रॅक करून त्याचा आढावा घेण्याची योजना होती असं वृत्त आहे. पण १५ ऑगस्टनंतर डेटा वर्गीकरण आल्यानंतर भाजपमध्ये शांतता पसरली आहे.

image (2)

समोर आलेल्या माहितीनुसार या साईटवर देशाची लोकसंख्या सोडा, धड भाजपच्या सदस्यांनी देखील रस दाखवला नाही असं आकडेवारी सांगते. देश आणि जगभरातून केवळ ४ कोटीचा आकडा समोर आला आहे. मात्र माध्यमांना ५-६ कोटी असा सांगण्यात आला आहे. त्यातही म्हणजे ४ कोटी पैकी १८ टक्के डेटा परदेशातील असून, देशातील एकूण ३२ टक्के लोकं ही अजून मतदार सुद्धा नसावेत असा अंदाज लावण्यात आला आहे. म्हणजे त्यात १८ वर्षापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी केवळ मजा म्हणून सेल्फी अपलोड केल्या आहेत असं डेटा सांगतो. तसेच भाजपच्या देशभरातील एकूण १८ कोटी सदस्यांपैकी 15 कोटी सदस्यांनी देखील याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भावनिक लाट ओसरल्याचं भाजपच्या वरिष्ठांना कळविण्यात आलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Har Ghar Tiranga website data analysis check details 17 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJP Har Ghar Tiranga(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x