24 November 2024 9:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी | चित्रा वाघ संतापल्या

BJP Leader Chitra Wagh

MLA Sanjay Rathod | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.

राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. तब्बल महिनाभर लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, शपथविधीने चित्र स्पष्ट झालं असून, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना डच्चू मिळाला आहे.

शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता त्याचं पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

भापच्या नेत्या चित्रा वाघ यांची टीका :
त्यानंतर भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत राठोडांना मंत्रिपद देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण :
बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. तिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले. अखेरीस पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा केला होता. पुजाचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Leader Chitra Wagh Vs MLA Sanjay Rathod check details 09 August 2022.

हॅशटॅग्स

#Sanjay Rathod(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x