16 April 2025 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER
x

नितीश कुमार यांनी भाजपाकडून महाराष्ट्राचा आनंद हिरावून घेतला, उत्तर भारतातून भाजपचा 2024 मधील मार्ग अत्यंत अवघड

BJP Mission 2024

Bihar Political Crisis | राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (एनडीए) फारकत घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळविण्याचा आनंद हिरावून घेतला आहे. तसेच बिहारमधून भाजपाला अत्यंत तगडे आव्हान दिले आहे. बिहार हे तेच राज्य आहे जिथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या स्थानिक पक्षाच्या अस्थित्वावर भाष्य केल्याने बिहारच्या प्रत्येक कोपऱ्यात बिहारी आत्मसन्मान जाग झाल्याने नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना प्रचंड समर्थन मिळालं आहे. त्यामुळे २०२४ मध्ये लोकसभेत भाजपचा सुपडा साफ होईल असं स्थानिक अनुभवी पत्रकार सांगत आहेत. याचे परिणाम पूर्वांचल मध्ये देखील दिसतील असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

२०२४ मध्ये अडचणी :
नितीशकुमार यांची नाराजी ओळखून भाजपने सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांच्या दुखावलेल्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. कारण २०२४ मध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, हे भाजप पक्षालाही माहीत आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना भाजपचा मैत्रीपूर्ण हेतू पटवून देण्यासाठी भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दोनदा पाटणा येथे पाठवले. विशेष म्हणजे 2025 पर्यंत नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच केलं होतं. त्यातून भाजपमध्ये २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किती धास्ती पसरली आहे त्याचा प्रत्यय येतं आहे.

गुजरात लॉबीची येथे काहीच चालणार नाही :
तसेच गुजरात लॉबीची येथे काहीच चालणार नाही हे देखील त्यांना माहित आहे. ईडी, सीबीआय किंवा इन्कमटॅक्स कामाला लावल्यास नितीश कुमार यांच्याकडे अशा काही केसेस आहेत की ते पट्टे उघड केल्यास भाजपचे बिहारमधील मोठे नेते जेल मध्ये जातील. त्यामुळे नेमकं करावं काय यावर दिल्लीतील भाजप धुरंदर डोक्याला हात लावून बैठक घेत असल्याचं म्हटलं जातंय.

2015 च्या विधानसभा निवडणुकीत राजद-जदयू युतीच्या हातून भाजपचा दारुण पराभव झाला होता. मुस्लिम आणि यादवांवर राजदची मजबूत पकड कायम आहे. नितीश कुमार आणि काँग्रेससह छोटे पक्ष एकत्र आल्याने ही आघाडी भाजपसाठी चांगलीच बोचरी झाली आहे. नितीशकुमार यांना (OBC) कुर्मी आणि कुशवाहांचा मोठा पाठिंबा असल्याचे सर्वश्रुत आहे. यासोबतच अतिमागास जातींमध्येही त्यांची लोकप्रियता आहे. ही समीकरणे भाजपच्या अडचणीत भर घालत आहेत.

ओबीसी नेते नितीश कुमार :
भाजपला मोठ्या आव्हानाची चिंता सतावत आहे. कारण वेळ फार कमी आहे. ओबीसी समाजातून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाला ओबीसी असलेल्या नितीश कुमार यांनी मोठं आव्हान निर्माण केल्याने चिंता वाढली आहे. बिहारला उत्तरेकडील तमिळनाडू म्हटले जाते, जिथे “मागास” लोकांची प्रचंड लोकसंख्या आहे. यामुळे जातीच्या राजकारणाची धार बोथट होण्यास मदत होऊ शकते. आतापासून दोन वर्षांनी काय होणार आहे याचा अंदाज बांधणे कठीण आहे,” भाजपचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणतात. पण २०२४ मध्ये मोठं आव्हान निर्माण झालं आहे हे वास्तव आहे. सध्या नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहार विधानसभेत भाजप हा एकमेव विरोधी पक्ष ठरला आहे’.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Mission 2024 became difficult after JDU RJD alliance check details 10 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJP Mission 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या