भाजप आ. अतुल भातखळकरांच ट्विट, पंतप्रधानांची 'मन की बात' ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी | नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
BJP MLA Atul Bhatkhalkar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात देशाला आपला संदेश दिला. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ९२ व्या पर्वात पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताच्या सामूहिक सामर्थ्याची ताकद देशानेच नव्हे तर जगाने पाहिली आहे.
देशाच्या या सामूहिक शक्तीने एक नवीन चेतना भावना दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपला देश हा विविधतेत एकता असल्याचे उदाहरण आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या विशाल देशात हवामान, भाषा, राहणीमान, जीवनशैली, मत, पंथ यासह असंख्य विविधता आहे, असे असूनही प्रत्येक घरात तिरंगा फडकवताना प्रत्येक भारतीय एकाच रंगात आणि भावनेने वाहताना दिसत होता. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले, “या ऑगस्ट महिन्यात तुम्हा सर्वांची पत्रे आणि संदेश पत्रांनी माझ्या कार्यालयाचा तिरंगा केला.
दरम्यान, मोदींनी याच कार्यक्रमात अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यानंतर याच विषयाला अनुसरून मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेन्शन करत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या मतदार संघातील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती असं म्हटलं आहे.
मात्र त्यांनी शेअर केलेल्या फोटोनुसार संबंधित ठिकाणी बसायला सुद्धा मुबलक जागा नसावी. मात्र उपस्थित १२-१५ लोकांना त्यांनी ‘नागरिकांनी गर्दी’ असं म्हटल्याने नेटिझन्स त्यांची जोरदार खाल्ली उडवत आहेत. अनेकांनी फिरकी घेणाऱ्या टिपण्या करताना काहींनी या महागाईत कोण तुमचं ऐकायला येणार असं देखील म्हटलं आहे.
काय आहे ट्विट आणि त्यावरील टिपण्या :
माझ्या मतदार संघातील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान @narendramodi यांचा #मन_की_बात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती… pic.twitter.com/3zuOwIJ0hV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 28, 2022
याच्यापेक्षा मोठी रांग तर सुलभ शौचालयासमोर असते..!! 😂
— शिवसैनिक शैलेश वर्मा 🇮🇳🏹 (@Shailesh_Varmaa) August 28, 2022
फोटो बघून असं वाटते की, लोकांनी तुला आणला आहे.
— अमिन हुददा. (@AMINHudda2) August 28, 2022
100,100 ₹ देऊन ऐकण्यासाठी बसवलाय😂
— Astha Mahajan (@patil_mahajan) August 28, 2022
मन की बात संपल्यावर वरील फोटोमधील धरुन बांधून आणलेल्या प्रचंड गर्दीतील कंटाळलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल, नै🤔😂
— 💝 DURGA 💝 (@Am_here_DURGA) August 28, 2022
मन की बात हा कार्यक्रम कधी होतो हे सर्वसाधारण जनतेला विचारलात का साहेब?
कोण ऎकतो आहे मी तर एकदाही नाही ऎकला त्याबद्दल त्यांना वाढती महागाई व बेरोजगारीबद्दल बोलायला सांगा आहे दम तुमच्याकडे.— Vijay Nakashe (@nakashe_vijay) August 28, 2022
नमस्कार सर, मन की बात म्हणजे साहेब एकटे बोलणार आणि इतर फक्त ऐकणार. कधीतरी जनतेच्या मन की बात पण ऐका हो. महागाई खूप त्रास देत आहे. याच वाढत्या महागाईमुळे आम्ही आपल्या साहेबांना निवडून दिले. कळकळीची विनंती ऐका आमची आणि महागाई कमी करा….. उपकार होतील 🙏🙏🙏
— Atul Hari Kurlekar (@atul_kurlekar) August 28, 2022
इतनी भीड़ देखकर भटखलकर साहब भूतकाल में जमा होने वाला हैं। ऐसा लगता है की अगले इलेक्शन में उनको टिकट मिलेगा कि संभावना कम है!, वैसे ही शिंदे गट का के साथ भाजपा की युति हुई है , तो हो सकता है उनकी जगह कोई शिंदे गट का एमएलए खड़ा हो ।
— BM Santosh (Santya) (@BMSantosh2) August 28, 2022
चेंगरा चिंगरी दोन जणांचा मृत्यू
— सिद्धेश पाटील (@Sagarpa31447100) August 28, 2022
लाखोंच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन 40 पैसे उंदीर मरण पावले 🤣🤣
— 50 खोके (@hemant44448888) August 28, 2022
— Robin Hood (@Social1Hood) August 28, 2022
ये बाबा भातुकलीचा खेल बघायला पण जास्त गर्दी होते रे बाबा
— Pratik Shivsena🚩 (@patilpratikp) August 28, 2022
एवढे तर आमच्या चावडीवर आजोबांच्या गप्पा ऐकण्यासाठी जमतात.
— Machindra Narode – हिंदुहृदयसम्राटांचा शिवसैनिक (@NarodeMachindra) August 28, 2022
मन की बात सोडा एक पत्रकार परिषद घ्या आणि पत्रकारांच्या प्रश्न ला उतर द्या. महागाई,नोकरभरती, शेतकरी विकास, यावर काही बोलत नाहीत माननीय मोदी साहेब.
— Rameshwar BEDRE (@BedreRameshwar) August 28, 2022
अरे याच्यापेक्षा जास्त गर्दी म्हैसचे केस भादरतांना पाहायला होते🤦♂️🤣😜😂
— Pankaj Jadhav. (@Pankaj_Shivsena) August 28, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BJP MLA Atul Bhatkhlkar tweet on Maan Ki Baat netizens reaction check details 28 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS