18 November 2024 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील | भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा सर्वपक्षांना इशारा

BJP President JP Nadda

BJP President JP Nadda | देशातील आणि राज्यातील सर्व प्रादेशिक पक्षांना एक मोठा अधिकृत राजकीय इशारा मिळाला आहे असंच म्हणावं लागले. राज्यातील शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी ते काँग्रेस सहित सर्वच पक्षांनी सावध राहावं असं धक्कादायक विधान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडून आलं आहे. हा इशारा शिंदे गटाला देखील आहे आणि त्याचा प्रत्यय त्यांनी भविष्यात येईल असाच भाजपचा इतिहास आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा काय म्हणाले :
आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील ते देखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. ते रविवारी बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारमधील भाजपच्या १६ जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जे.पी. नड्डा यांनी अत्यंत आक्रमक शैलीत केलेल्या भाषणात देशभरातील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा इशारा दिला.

कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही :
आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत तेदेखील संपतील. केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.

दुसऱ्या पक्षांमध्ये राहिलेले लोक आपल्याकडे :
यावेळी जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस पक्षावरही हल्ला चढवला. लोक काँग्रेसविषयी बोलतात. माझं मतं आहे की, पुढील ४० वर्षे तरी काँग्रेस पक्ष भाजपसमोर उभा राहू शकत नाही. ते आपली बरोबरी करू शकत नाहीत. भाजप ज्याप्रकारचा पक्ष आहे, ते काही दोन दिवसांमध्ये साध्य होत नाही. हे सर्व संस्कारातून येते आणि संस्कार हा पक्षाकडूनच येतो. भाजपची विचारधारा इतकी पक्की आहे की, २० वर्षे दुसऱ्या पक्षांमध्ये राहिलेले लोक आपल्याकडे येत आहेत, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP President JP Nadda warn all political parties check details 01 August 2022.

हॅशटॅग्स

#BJP President JP Nadda(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x