22 February 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Brand Rahul Gandhi | कर्नाटक निकालानंतर ममता बॅनर्जींचा राजकीय सूर बदलला, काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी ठेवली 'ही' अट

Brand Rahul Gandhi

Karnataka Result Effect | कर्नाटकातील सकारात्मक निकालानंतर काँग्रेससाठी अचानक राजकीय वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. यामुळे कालपर्यंत काँग्रेसपासून दूर राहण्याचे निमित्त शोधणाऱ्या बड्या नेत्यांचा सूर आता बदलला आहे. एका बाजूला महाराष्ट्रात शरद पवारांचे सूर बदलू लागले होते तेच आता कर्नाटकातील निकालानंतर महाविकास आघाडीच्या बैठकांवर केंद्रित झाले आहेत.

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं सूर सुद्धा बदलेले आहेत. ममतांनी 2024 च्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याबदल्यात त्यांनी एक महत्त्वाची अट घातली आहे. विरोधकांच्या ऐक्याच्या संभाव्य रणनीतीबाबत ममतांनी पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसची भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे.

स्थानिक पक्षांना प्राधान्य
ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल राज्य सचिवालयात पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाले की, काँग्रेस जिथे मजबूत असेल तिथे त्यांनी निश्चित जोर लावून लढले पाहिजे. आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यात काहीही चुकीचे नाही. मात्र, काँग्रेसने इतर पक्षांनाही पाठिंबा द्यावा, असेही ममता म्हणाल्या. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये स्थानिक पक्ष जिथे मजबूत आहेत, तेथे त्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी आशाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. याआधी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबद्दल अशा प्रकारे कधीही उघडपणे बोलत नव्हत्या.

पूर्वी त्या कॉंग्रेसला टाळत असत
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता गेल्यानंतर तेथील जनतेला सलाम केला होता. यापूर्वी तृणमूलचा ज्या पक्षाशी संघर्ष झाला आहे, त्या देशातील सर्वात जुन्या पक्षाचा उल्लेख करणेही त्यांनी टाळले. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी असेही म्हटले होते की, जर राहुल गांधी कॉंग्रेसचे नेतृत्व करत राहिले तर भाजप अशाच प्रकारे जिंकत राहील. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावरही काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. तेव्हा ममता बॅनर्जी यांना राहुल गांधींवर निशाणा साधून आपली प्रतिमा उजळवायची होती, असे मानले जात होते. मात्र आता त्यांना राहुल गांधी काय करू शकतील याचा ममतांना देखील अंदाज आल्याचं म्हटलं जातंय.

काँग्रेसच्या विजयावर विरोधकांचा सूर काय?
काँग्रेसच्या विजयानंतर विरोधकांना अचानक बळ मिळाले आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांचा सूर बदलला आहे, तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही याबाबत उत्साह व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत काँग्रेसचा विजय हा विरोधकांचा सामूहिक विजय असल्याचे म्हटले जात आहे. आता कर्नाटकातील या विजयाच्या जोरावर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा चेहरा बनण्याची काँग्रेसची इच्छा पूर्ण होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brand Rahul Gandhi Image after Karnataka Assembly Election Result 2023 check details on 15 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Brand Rahul Gandhi(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x