18 November 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत आप पक्षाच्या बाजूने सर्व्हे | तर दिल्लीत आपच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी CBI'ची छापेमारी

CBI raided

DCM Manish Sisodia | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली आहे. हे पथक एकाचवेळी २१ ठिकाणी छापे टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने छापे टाकलेल्या 21 ठिकाणांमध्ये तत्कालीन दिल्ली एक्साइज कमिशनर आरव गोपी कृष्णा यांच्या परिसराचा समावेश आहे. नव्या उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात हा छापा टाकण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

खरं तर, लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के.सक्सेना यांनी अलीकडेच सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. मुख्य सचिवांच्या अहवालानंतर त्यांनी ही शिफारस केली. या अहवालात उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. उत्पादन शुल्क विभागही सिसोदिया यांच्या अखत्यारीत आहे.

अरविंद केजरीवाल यांची टीका :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणावर ट्विट केलंय. दिल्लीचं शिक्षण मॉडेल आणि आरोग्यतील प्रगतीबाबत जगभर चर्चा होत आहे. दिल्लीची ही वाहवा या लोकांना सहन होत नाही. ही प्रगती, ही प्रशंसा त्यांना रोखायची आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. 75 वर्षात चांगलं काम करणाऱ्यांची अडवणूक झाली. त्यामुळेच देश मागे राहिलाय. पण आमचं उद्दिष्ट दिल्लीची प्रगती आहे. त्याला कुणीही रोखू शकत नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक :
गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्यासाठी आप पक्ष जोरदारपणे कामाला लागला आहे. पंजाबनंतर आता थेट गुजरातमध्ये विजयाच्या दिशेने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे येथे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेत्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने इथली जनता भाजपच्या २७ वर्षाच्या कारभाराला कंटाळल्याचं लोकांच्या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळतंय.

विशेष म्हणजे ६ महिन्यांपूर्वी केलेल्या सर्व्हेत आप पक्षाला सध्या जवळपास 58 जागा जिंकण्याचे संकेत मिळाले आहेत. स्वतः आप पक्षाने एका मोठ्या एजन्सीकडून करून घेतलेल्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर आली आहे, असा दावा आम आदमी पार्टीने (आप) केला आहे. आणि हा आकडा वर्षाअखेर पर्यंत दुप्पट होऊ शकतो असं म्हटलंय. प्रसिद्ध एजन्सीच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात आले,’ असे ते म्हणाले.

गुजरात भाजप सरकारच्या सर्व्हेतही धक्कादायक आकडेवारी समोर :
काँग्रेस इथे भाजपला पराभूत करू शकत नाही, असं गुजरातच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचं मत आहे. त्यामुळे इथे लोकांनी आप पक्षाला जवळ केल्याचं म्हटलं जातंय. जसजसे दिवस पुढे सरकत आहेत तसं आपला समर्थन वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे भाजपाची धाकधूक वाढली आहे. राज्यातील भाजप सरकारच्या राज्य गुप्तचर विभागाने ४ महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ‘आप’ला ५५ जागा दिल्या आहेत आणि तो आकडा प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी दुप्पटीहून अधिक होऊ शकतो असं दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुजरातचे दौरे आणि प्रचार कार्यक्रम वाढवल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोड शोसह काही कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जातं आहे.

आपच्या शिस्तबद्ध प्रचार यंत्रणेची भीती :
आम आदमी पक्षात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित तरुणाची टीम असल्याने भाजपच्या प्रचार यंत्रणा पूर्णपणे फेल होताना दिसत आहेत. भाजप त्यांना लक्ष करताना धार्मिक मुद्द्यावरून हल्ला करत आहे, परंतु आप त्यावर भाष्य न करता केवळ शिक्षण, वीज, पायाभूत सुविधा, बेरोजगारी आणि महागाईवर ‘फोकस’ प्रचार करत असल्याने भाजपच्या अडचणी अजून वाढत आहेत. त्यामुळे नेमकं काय करावं याची चिंता गुजरातमधील भाजप नेत्यांना सतावत आहे. विशेष म्हणजे गुजराती व्यापारी देखील भाजपच्या सरकारवर आणि राज्यातील भ्रष्ट सरकारी बाबूंना कंटाळून आप पक्षाच्या सेमिनारमध्ये हजेरी लावत आहेत. परिणामी केंद्रातील मोदी सरकार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धास्तावल्याने दिल्लीच्या नेत्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ट्रॅप करत असल्याचं म्हटलं जातंय. मात्र तरीही आप गुजरातमध्ये फोकस मुद्यांवर प्रचार करत असल्याने भाजपच्या पायाखालील जमीन सरकल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. गुजरातमध्ये धक्का बसल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुका मोदी आणि भाजपाला धोक्याचे संकेत देणाऱ्या ठरतील असे पत्रकार सांगत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : CBI raided on  Delhi deputy chief minister Manish Sisodias house check details 19 August 2022.

हॅशटॅग्स

#CBI(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x