18 November 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

पुलवामा हल्ल्यासंदर्भातील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचं वास्तव उघड करणाऱ्या सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावली

Satyapal Malik

CBI Seeks Answers from Satyapal Malik | काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारला लक्ष करताना गंभीर आरोप केला होता. पुलवामा हल्ल्याचा लोकसभा निवडणुकीत उपयोग करायचा होता म्हणून मोदींनी मला यावर शांत राहायला सांगितलं होतं असा धक्कादायक खुलासा एका मुलाखतीत केला होता. आता त्याच जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने घेरण्याची तयारी केल्याचं वृत्त आहे.

सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विमा प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नोटीस बजावली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने कथित विमा प्रकरणात तोंडी समन्स बजावले आहे. सीबीआयने त्यांना २७ आणि २८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, सीबीआयने यासंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांना समन्स बजावले आहे. मलिक यांनी दावा केला होता की, त्यांना दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. दरम्यान, सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांची ही चौकशी केली होती.

काय होती चौकशी
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना दोन फायली मंजूर करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, ती त्यांनी फेटाळून लावली होती. आरोपांच्या आधारे एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांसंदर्भात एजन्सीने त्यांची चौकशी केली आहे.

त्यानंतर सत्यपाल मलिक यांची दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली. या चौकशीतून काय निष्पन्न झाले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांनी सांगितले की, मलिक यांची आरोपी म्हणून चौकशी करण्यात आलेली नाही, परंतु एक प्रकारे त्यांच्या आरोपांवर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. मलिक यांच्या आरोपानंतर जम्मू-काश्मीर सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CBI Seeks Answers from Satyapal Malik check details on 21 April 2023.

हॅशटॅग्स

#Satyapal Malik(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x