24 February 2025 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Amount | पगारदारांच्या बँक अकाउंटमध्ये ग्रॅच्युइटीचे 2,88,461 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या
x

Clean Chit To Aryan Khan | आर्यन खान प्रकरणातील 'फर्जीवाड़ा' पोलखोल झाल्यावर वानखेडे निरुत्तर झाले

Clean Chit To Aryan Khan

Clean Chit To Aryan Khan | आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरण शुक्रवारी मोठा निकाल लागला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने खान यांना क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनीही एनसीबीच्या पहिल्या पथकाने या प्रकरणात चूक केली असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कारवाई करणारे एजन्सीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांना काहीच बोलायचे नाही. वानखेडे यांनीच गेल्या वर्षी क्रूझवर छापा टाकण्याचे नेतृत्व केले होते.

तेव्हा पत्रकार परिषदेचा सपाटा :
आर्यन खानला अटक झाल्यापासून तसेच मंत्री नवाब मलिक यांनी ‘फर्जीवाडा’ पोलखोल सुरु केल्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय वारंवार कॅमेऱ्यावर झळकताना आणि पत्रकार परिषद घेताना दिसले होते. मात्र सध्या तसं होताना दिसत नाही आणि त्याचे कारण म्हणजे ‘नवाब मलिक यांनी पोलखोल केलेला ‘फर्जीवाडा’ सत्य असल्याचं सिद्ध झालं आहे.

समीर वानखेडेंचं तोंड बंद :
आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे प्रश्न टाळताना दिसले. वृत्तवाहिन्यांनी संपर्क केळीवर ‘सॉरी, मला काही बोलायचं नाहीये. मी एनसीबीमध्ये नाही, एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी जाऊन चर्चा करा असं उत्तर देऊन फोन कट करत आहेत. विशेष म्हणजे ही बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्रात बराच वादंग निर्माण झाला होता.

आर्यन खानला क्लीन चिट :
शुक्रवारी एनसीबीने क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात 6 हजार पानी आरोपपत्र दाखल करून आर्यन खानला क्लीन चिट दिली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कॉर्डियालिया क्रूझ जहाजावर छापा टाकताना अटक करण्यात आलेल्या २३ जणांमध्ये खान यांचा समावेश होता.

दोषी ठरवून खंडणीचा प्रयत्न :
यापूर्वी, हिंदुस्थान टाईम्सने २ मार्चच्या एका वृत्तात म्हटले होते की, आर्यन खान हा अंमली पदार्थांच्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा भाग होता, असे सूचित करणारा कोणताही पुरावा एजन्सीला मिळालेला नाही. या प्रकरणात खान यांना दोषी ठरवून खंडणीचा प्रयत्न केल्याचे आरोप समोर आल्यानंतर हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास :
त्यानंतर संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने पुन्हा तपासणी केली असता, खान यांच्याविरोधातील खटला निकाली काढण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे आढळून आले. ६ नोव्हेंबर रोजी चौकशीची सूत्रे हाती घेणाऱ्या एसआयटीला कळाले की खानकडे कधीही ड्रग्ज नव्हते आणि त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती.

चॅटमधून काहीच हाती लागलं नाही :
आर्यन खान कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग असल्याचे चॅटमधून स्पष्ट होत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच एनसीबीच्या मॅन्युअलनुसार छाप्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले नव्हते आणि वेगवेगळ्या अटक आरोपींकडून सापडलेले ड्रग्ज जप्त केल्याचे दाखवण्यात आले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Clean Chit To Aryan Khan in Drug Case check details here 27 May 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aryan Khan(2)#Sameer Wankhede(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x
close ad x
Marathi Matrimony