16 April 2025 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

सर्व्हेत संपूर्ण राज्यात शिंदे गटाला 5% मतं मिळत नसल्याने, शिंदेनी पेड जाहिरात देऊन स्वतःच स्वतःची टक्केवारी जाहीर केली? फडणवीसांना डच्चू

CM Eknath Shinde

Shinde Camp Advertisement | मागील दिवसांपासून अनेक सव्हे प्रसिद्ध झाले असून त्यात शिंदे गटाची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं समोर आलाय. सर्वच बाजूने महाविकास आघाडी उजवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सामान्य जनतेला एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या आहारी जाऊन शिवसेना पक्ष फोडण्याचा निर्णय रुचलेला नाही हे देखील आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. मागील एका प्रतिष्ठित सर्व्हेत संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाला केवळ ५% टक्के मतं मिळतील अशी आकडेवारी समोर आली होती. मात्र आता शिंदेंनी ‘आर्टिफिशिअल’ म्हणजे स्वतःच आकडेवारी जाहीर करून आणि त्याची जाहिरात करून अधिक टक्केवारी दाखवून स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, भाजप-शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चित्र राज्यात दिसू लागलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व आलबेल असल्याचे दावे केले जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, अशा मथळ्याखाली देण्यात आलेल्या या जाहिरातीतून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच डच्चू दिल्याचं म्हटलं जातंय आणि शिंदेनी जाहिरातीत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा नारा बदलून फडणवीसांना इशारा देताना स्वतः मोदींशी जवळीक साधण्याचा राजकीय प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय.

वर्तमान पत्रात शिंदेंच्या पेड जाहिरातींचा सुळसुळाट

शिवसेनेची एक जाहिरात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे.”

पुढे म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

शिंदेनी ही टक्केवारी आणली कुठून हाच संशोधनाचा विषय

सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.”

शिवसेनेने असाही दावा केला आहे की, “मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली आहे”, असा मजकूर या जाहिरातीत आहे.

Shinde ads

News Title : CM Eknath Shinde advertisement in newspaper media check details on 13 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या