23 February 2025 2:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

हे तर ऐतिहासिक खोटं बोलणारे मोदी भक्त मुख्यमंत्री? कोरोनाकाळात फोनवर ऑक्सिजन पाठवला सांगितलं, पण 'हे' सत्य लोकांपासून लपवलं

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेल्या रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी काम करणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून फक्त आदेश देणारा मुख्यमंत्री नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. विशेष म्हणजे स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यासाठी त्यांनी थेट कोरोना काळात आपण लोकांना एका फोनवर लोकांना कसा ऑक्सिजन पुरवठा केला होता हे सांगितलं. वास्तविक एका महत्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदावरील मंत्र्याने फोन लावून एखादी गोष्ट पाठविणे यात विशेष काय? पण एकनाथ शिंदे यांनी फक्त फोनकरून पाठवलेली ती गोष्ट मिळविण्यासाठी कोणाला किती झगडावं लागलं होतं हे त्यांनी लोकांना सांगितलं नाही. कारण ते मंत्री असताना त्यांचे फोन केंद्रातील भाजप नेते तर उचलणार नव्हते. पण, ज्यांचे फोन मुख्यमंत्री पदी असताना (उद्धव ठाकरे ) देखील भाजपचे वरिष्ठ याच कोरोना काळातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उचलत नव्हते आणि त्यावेळी नेमकं काय केलं आणि कसा देश-विदेशातून ऑक्सिजन झगडून आणला आणि इस्पितळापर्यंत पोहिचवला ते मीडिया रेकॉर्डवर आहे. हा तोच शिंदेंना आयात मिळालेला ऑक्सिजन होता जो त्यांनी फोन करून ठाण्यातील आजूबाजूच्या इस्पितळांना पाठवला होता. आता नशीब कोरोना काळात शिंदेंना शिवसेना फोडली नव्हती असं बोलण्याची वेळ आली आहे. कारण त्यावेळी महाराष्ट्रातील इस्पितळांच्या वाट्याला आलेला ऑक्सिजन फॉक्सकॉन प्रमाणे एका फोनवर गुपचूप गुजरातला वळवला नसताना याची चर्चा देखील समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. नेमकं काय घडलं होतं तेव्हा ते वाचा म्हणजे शिंदे किती ऐतिहासिक खोटं बोलत आहेत त्याची जाणीव होईल.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात ऑक्सिजनसाठी केंद्राशी झगडत होते :
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू झाला होता आणि त्याला कारण होतं कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी तातडीचा ऑक्सिजन पुरवठा. त्यासंदभात, 17 एप्रिल 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नावर मुंबईमधून राज्यसभेवर निवडून गेलेले गुजराती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीत प्रचार करीत आहेत आणि म्हणूनच ते उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू शकत नाहीत, असे कळविले होते. याबाबत सार्वजनिकरित्या वृत्त प्रसिद्ध झाली होती.

पण भाजपशासित राज्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दिलदारपणा :
भाजपशासित मध्य प्रदेशात २० टन ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्रातून केला जाईल याची माहिती (सप्टेंबर २०२१) बैठकीत देण्यात आली होती. ते काम आयनॉक्स कंपनी कडे होते. हीच कंपनी गुजरात आणि उत्तर प्रदेशातील प्लांटमधून मध्य प्रदेशला ऑक्सिजनचा पुरवठा करणार होती. 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील रुग्णालयांना 80 टक्के ऑक्सिजन देण्याचे आदेश दिले होते आणि उर्वरित ऑक्सिजन मध्य प्रदेशला धाडण्याचा निर्णय तत्कालीन उद्धव ठाकरे यांनी राजकारण न करता घेतला होता.

कोरोना काळातही भाजपाशासित राज्याचं महाराष्ट्रविरोधी राजकारण :
तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना (६ मे २०२१) म्हणाले की, “कर्नाटकात ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय हा केंद्राचा आहे. मात्र, या पद्धतीने लिक्विड ऑक्सिजनचा राज्याचा कोटा कमी करणे योग्य नाही. आजच्या आजच आम्ही याबाबत केंद्र सरकारकडे अपील करणार आहोत”, असे म्हणत राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, त्या प्रकारामुळे राज्यातील सांगली, कोल्हापूरसारख्या प्रमुख जिल्ह्यांसमोरचे कोरोना काळातील आव्हान वाढलं होतं. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून महाराष्ट्राला होणारा ५० मेट्रीक टन ऑक्सीजन पुरवठा थांबवला होता. सांगली, कोल्हापूरसारख्या प्रमुख जिल्हे आणि आसपासच्या परिसरांतील आरोग्य यंत्रणांना ह्याचा फटका बसला होता. परिणामी विदेशातूनही तत्कालीन मुख्यमंत्री यांनी देश पातळीवर तसेच विदेशातही यंत्रणा कामाला लावून आणि अधिक आर्थिक नियोजन करून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन साठा मागवून घेतला होता. स्वतः तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि पुरवठ्याबाबत आरोग्य मंत्र्यांसोबत ताळमेळ ठेवून काम करत होते. अगदी, ऑक्सिजन साठा येण्याच्या ठिकाणी आदित्य ठाकरे स्वतः हजार असायचे. स्वतः महाराष्ट्रनामा’ने याबाबत वृत्त दिलं होतं.

तत्कालीन मुख्यमंत्री केंद्राशी झगडले आणि केरळमधून विशेष ट्रेनने ऑक्सिजन मागवला होता

Oxygen

नशीब शिंदेंनी कोरोनाकाळात शिवसेना फोडली नव्हती, अन्यथा राज्याचा ऑक्सिजन पण गुजरातला?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि एकावर एक मोठं मोठे उद्योग गुजरातला जाऊ लागले आणि राज्यातील तरुणांचे लाखोने रोजगार हिरावले गेले. पण, त्यावर त्यांनी चक्कर शब्द न काढता शांत राहणं पसंत केले. आता कोकणातील स्थानिक तरुणांना निवडणुकीच्या काही महिने आधी रोजगाराचं गाजर दाखवत आहेत. पण, याच शिंदेंचे ठाण्यातील अनेक समर्थक हे जे कट्टर शिवसैनिक तरुण शिंदेंच्या गटात जाण्यास तयार नाहीत त्यांना बेरोजगार करण्याचा कसा सपाटा लावत आहेत हे ठाण्यात लपून राहिलेलं नाही. मुख्यमंत्री शिंदे स्वतःला सहानुभूती मिळावी म्हणून केविलवाणे प्रकार करत आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी ते अघोषीतपणे इतर अनेक कुटुंबांचा देखील शिस्तीत वापर करत आहेत. अगदी आजच्या खेड मधील सभेत त्यांनी, ‘मुलाने जन्मदात्या बापाचं नाव घेतलं म्हणजे बाप छोटा होतो हा जावई शोध देखील लावला आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे जन्मदाते वडील होते हे त्रिकाल सत्य आहे. पण यावर देखील त्यांना आक्षेप आहे हे पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे याच भाषणात ते स्वतःच्या वडिलांचं खेडशी कसं नातं आहे, ते सांगायला विसरत नाहीत हे विशेष म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे आता कोरोना काळातील आयत्या मिळालेल्या ऑक्सिजन पुरवठ्यावर, मंत्रिपदाचा फायदा घेत मी कसा लोकांना ऑक्सिजन पुरवला हे ओरडून सांगताना आयती सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, पण कितीही झालं तरी वारंवार पकडले जात आहेत असंच म्हणावं लागेल.

News Title: CM Eknath Shinde exposed after half truth talked in Khed rally check details on 19 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x