शिवसेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक शक्य तितक्या लवकर भाजपात 'गट' म्हणून विलीन करणं हेच शिंदेंना लक्ष दिलंय?

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारची आज खरी परीक्षा असणार आहे. कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झालेले असताना राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असून, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झटका दिलाय.
नव्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर दाखल केलेल्या याचिकेनंतर विधिमंडळ सचिवालयाने अध्यक्षांच्या आदेशानुसार गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कायम ठेवली आहे. तर सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणूनची नियुक्ती रद्द केलीये. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनं त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली होती. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती.
शिंदेंना घाई का :
एकनाथ हिंडे यांना याची सर्व कल्पना आहे की शिवसेनेचं चिन्हं आणि नाव मिळणं अशक्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर सेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक आणि जिल्हा स्तरावरील नेते मंडळींना स्वतःच्या गटात आणण्याची टार्गेट लाईन भाजपच्या वरिष्ठांकडून निश्चित करून देण्यात आली आहे. या सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांना एक गट म्हणून भाजपात विलीन करण्याची योजना असून त्यानंतर या सर्व नेत्यांचे परतीचे मार्ग बंद करण्याची भाजपाची योजना आहे. मात्र याबद्दल एकनाथ शिंदे यांनी सर्वांना अंधार ठेवल्याचं वृत्त आहे. परिणामी एका बाजूला दिलदार नेते असा शिंदेंचा पाढा वाचला जातं असला तरी ते सर्वांना अंधारात ठेवून एक मोठं स्वार्थी राजकारण खेळत असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या विरोधात काही निर्णय लागण्याची देखील शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच सर्वच विषयात घाई केली जात असल्याचं वृत्त आहे.
सेना पूर्णपणे फोडून मग निवडणूका जाहीर होणार :
शिवसेना लवकरात लवकर फोडून पुढच्या ५-६ महिन्यात विधानसभा जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेतून आलेले नेते भाजपात किती दिवस टिकतील आणि भाजपात त्या-त्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत बंड उभं राहू शकतं अशी भाजपाला भीती आहे. परिणामी, सर्व व्यवस्थित असल्याचं दाखवून अचानक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच स्वतः मोदींनी हे सरकार पुढला कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हटलं आहे आणि त्यामुळे ते त्याच्या नेमकं उलटं करणार हे देखील स्पष्ट झालं आहे. फडणवीस आणि त्यांचे समर्थक सुद्धा शिंदेंना अधिक काळ मुख्यमंत्री पदी पाहू इच्छित नाहीत त्यामुळे अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Eknath Shinde is working with BJP political deadline check details 04 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल