15 January 2025 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

राज्यावर अनेक संकटं असताना महाराष्ट्र 'राम-भरोसे', मुख्यमंत्री शिंदें सुट्टीवर की महाशक्तीकडून 'कायमच्या सुट्टीपूर्वी' 3 दिवसांची सुट्टी मंजूर?

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde on Leave | विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील दोन दिवस कर्नाटक आणि दोन दिवस मॉरिशसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज म्हणजे २५ व २६ एप्रिल रोजी ते कर्नाटकात असतील, त्यानंतर २७ रोजी नागपूरला भेट देतील आणि २८ व २९ रोजी मॉरिशसचा दौरा करतील.

दुसरीकडे, राज्यात अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील ३ दिवस सुट्टी घेऊन कुटुंबासह साताऱ्यात असल्याचं वृत्त आहे. आध्यात्मिक कारणास्तव हा पूर्वनियोजित दौरा असल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केला असला, तरी अलीकडील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अस्वस्थ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवसेना फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या बहुप्रतीक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी रवाना झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपासून भाजपला निवडणुकीच्या अनुषंगाने कुचकामी ठरू शकणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविण्यासाठी दिल्लीतून हालचाली सुरु असल्याची वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. अशातच एकनाथ शिंदे आत्तापासूनच शेतीची तयारी करत आहेत का याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे पुढील अजून दोन दिवस कुटुंबासह पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कारणास्तव हा पूर्वनियोजित दौरा असल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केला असला, तरी अलीकडील घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अस्वस्थ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ जणांचा मृत्यू हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून, हा त्यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या प्रयत्नाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संभाव्य बंडखोरीची चर्चा आणि मुख्यमंत्रिपदावरून त्यांनी केलेले वक्तव्य यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असे शिंदे यांच्या निकटवर्तीयाने सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आपल्या गावातील पूजेत सहभागी होतील आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवतील. ते बुधवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde on Leave for 3 days check details on 25 April 2023.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x