15 November 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Viral Video | शिंदे पिता-पुत्रच काय, तुम्ही सुद्धा न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर पैसे मोजून पेड जाहिरात करू शकता, हे आहे बिलबोर्ड रेट कार्ड

CM Eknath Shinde

Viral Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर झळकली. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल यांचाही फोटो या स्क्रीनवर दिसला. राज्यातील विविध उपक्रमांची माहिती स्क्रीनवर दाखवली गेली.

राहुल कनाल यांच्यावतीन टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर महाराष्ट्रातील उपक्रमांची माहिती दाखवण्यात आली. पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर महाराष्ट्रातील नेत्यांचा फोटो झळकला. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र नुकताच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. मात्र ही पूर्णपणे केली गेलेली पेड जाहिरात आहे, दुसरं काहीच नाही.

टाईम्स स्क्वेअरमध्ये जाहिरात करण्यासाठी किती खर्च येतो?

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर कोणीही स्वतःची जाहिरात करू शकतो. त्यासाठी तुम्हाला केवळ जाहिरातीचे पैसे खर्च करावे लागतील. मुंबईत ज्याप्रमाणे एखाद्या गजबजलेल्या किंवा गर्दीच्या ठिकाणी डिस्प्ले जाहिरात दिसते, तोच हा प्रकार सुद्धा आहे. आपण निवडलेले विशिष्ट मीडिया स्वरूप (बिलबोर्ड किंवा स्ट्रीट फर्निचर), जाहिरातीची लांबी आणि त्यातील ऑडिओचे प्रमाण यासह अनेक घटकांवर अवलंबून असते. एका होर्डिंगची किंमत 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी $5,000 पासून ते $50,000 पर्यंत असू शकते. थोडक्यात, 1 ते 3 दिवसांच्या अल्प कालावधीसाठी जाहिरात करण्यासाठी आवश्यक किमान रक्कम $5000 ते $25000 दरम्यान असते.

शिंदे गटातील धनवान नेत्यांनी सुद्धा स्वतः तोच प्रकार केला आहे. ही जाहिरात पूर्णपणे पेड असते. राहुल कनाल यांनी हे केवळ शिंदेंना खुश करण्यासाठी केलेली पेड जाहिरात आहे, दुसरं काहीच नाही. फरक इतकाच आहे की टाईम्स स्क्वेअरच्या एका डिजिटल बिलबोर्डवर हे बॅनर्स झळकले तेव्हा टाईम्स स्क्वेअरवर उपस्थितांनी वर पाहिलं नसावं, म्हणून तेच फोटो भारतातील मीडियात देऊन फ्री बातम्या छापून आणल्या एवढाच त्याचा राजकीय अर्थ आहे.

News Title : CM Eknath Shinde photo appeared on times square with paid advertisement 05 August 2023.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x