14 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

एकनाथ शिंदेंना बंडखोरी नियोजन फेल होण्याची भीती, अनेक आमदार आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिनेच झाले, पण त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजीला सध्या त्यांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच भाजपमुळे त्यांना मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करता येत नाही.

खरे तर शिवसेनेतील बहुतेक बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये स्वत:ला मंत्री म्हणून पाहायचे आहे आणि हेच या अडचणीचे कारण आहे. सध्या खरी शिवसेना आणि बनावट शिवसेना हा वादही सुरू असून, तो सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापुढे प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत मंत्री होऊ न शकल्यास उद्धव ठाकरे गटासोबत जाऊ शकणारे काही आमदार आहेत आणि थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कांत असल्याचं वृत्त आहे. असं झालं तर एकनाथ शिंदेंना यांना ते फार कठीण जाणार आहे.

४-५ आमदार फुटले तरी गेम प्लॅन बिघडणार :
काही आमदार गेले तर एकनाथ शिंदे गटाला पक्षांतर कायद्याचा धोका निर्माण होईल. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा मिळाला. शिवसेनेचे एकूण ५४ आमदार आहेत. अशा परिस्थितीत पक्षांतराचा कायदा टाळता यावा म्हणून किमान ३७ आमदारांचा वाद मिटेपर्यंत त्यांना सोबत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांपैकी चार जरी वेगळे झाले तरी ही संख्या ३६ राहणार असून पक्षांतर कायद्याचा पेच निर्माण होईल. एतीच कनाथ शिंदे यांची अडचण आहे आणि त्यामुळे ते आमदारांचं मन वळवण्याचा गुपचूप प्रयत्न करत आहेत. तर इतर मोठ्या नेत्यांच्या खुलेआम भेटी घेऊन प्रसार माध्यमांवर हेडलाईन मॅनेजमेंट करत सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र निर्माण करत असल्याचं म्हटलं जातंय.

शिवसेनेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात प्रलंबित :
शिंदे गटाच्या एका सदस्याने सांगितले की, “सध्या हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय निवडणूक आयोगाकडेही दोन्ही बाजूंची याचिका प्रलंबित आहे. पण यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्रिपद न मिळालेले नेते उद्धव कॅम्पमध्ये गेले तर खऱ्या शिवसेनेवरील दाव्याचा आधार कमकुवत होईल. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाचे ४० पैकी केवळ ९ आमदार मंत्री झाले. अशा परिस्थितीत शिवसेनेविरोधात बंड केल्यावर मोजक्यांना मिळायचं ते मिळालं पण अनेकांना असंतुष्ट ठेवलं जाईल असं चित्र बंडखोरांमध्ये आहे. याशिवाय एका बाजूला त्यांच्या निवडणूक जिंकण्याची शक्यता कमकुवत होऊ शकते आणि आगामी निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव होऊ शकतो असं शिंदे गटातील अनेक आमदारांना वाटत असल्याचं एक आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

भाजप आणि छोट्या पक्षांचेही मंत्रीपदावर लक्ष :
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आता जास्तीत जास्त 23 लोकांना मंत्री बनवू शकतात, तर सर्व 31 आमदार अपेक्षित आहेत. याशिवाय भाजपलाही कोट्यात ठेवावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आमदारांपर्यंत कसं पोहोचायचं हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. किंबहुना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडेही भाजपची नजर असून, त्यांच्या आमदारांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत अधिक मंत्रीपदे हवी आहेत. याशिवाय छोट्या पक्षांचे आमदारही मंत्रीपदाची मागणी करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde supporters may join Shivsena party again check details 03 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x