14 November 2024 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

सामान्य शिवसैनिकांमध्ये आणि मराठी मतदारांमध्ये शिंदे गटाविरोधात लाव्हा धगधगतोय, बिथरलेला शिंदे गट सर्व्हे करून घेणार

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | शिवसेनेविरोधात बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आता त्यांच्या या निर्णयाने शिवसैनिक आणि सामान्य जनता विशेष करून मराठी मतदार खूश आहेत की नाराज, याची चिंता सतावत आहे. जमिनीवरील वास्तव वेगळं असून एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजप नेते महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या कुटुंबियांना राजकारणातून हद्दपार करू इच्छित असल्याची भावना सामान्य मराठी मतदारांमध्ये निर्माण झाल्याचं जमिनीवरील झिरो ग्राउंड रिपोर्ट सांगतो.

अगदी एकनाथ शिंदे ज्या ठाण्याच्या जीवावर राजकारण करतात तिथे त्यांच्या विरोधात मराठी मतदारांमध्ये लाव्हा धगधगत असल्याचं त्यांना ठाण्यातूनच कळून चुकलं आहे. तेच कारण आहे की आदित्य ठाकरेंना ऐकण्यासाठी राज्यभर तुफान गर्दी होतं असल्याचं प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. त्यात अजून स्वतः उद्धव ठाकरे बाहेर पडलेले नाहीत आणि ते बाहेर पडल्यावर ती शिंदे विरोधातील लाट तीव्र होण्याची चिंता त्यांना सतावते आहे. त्यामुळे भाजपमध्येही चिंचेचं वातावरण आहे आणि त्यामुळे भाजप नेत्यांनी शिंदेंना एक सर्व्हे करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आदित्य ठाकरे आजकाल मोर्चे काढत आहेत आणि विशेषत: बंडखोर आमदारांच्या भागात जात आहेत. दरम्यान, भाजपच्या सल्ल्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांमध्ये आणि मराठी लोकांमध्ये सर्व्हे करण्याचा विचार करत आहेत. या माध्यमातून त्यांच्या बंडाच्या निर्णयावर शिवसैनिक आणि सामान्य लोकं काय विचार करतात, हे जाणून घ्यायचे आहे. खरे तर महापालिकेच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीनुसार नियोजन करण्याची एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. इथे काही चुकलं तर संपूर्ण राजकीय आयुष्य उध्वस्त होईल अशी चिंता बंडखोरांना सतावते आहे. मनसेकडे मतदारच नसल्याने त्यांचा काही राजकीय फायदा होणार नाही आणि त्यात भावनिक लाट उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याने मनसेची उरली सुरली राजकीय पत सुद्धा संपुष्टात येईल अशी शिंदे गटाला शंका आहे. त्यामुळे या सर्वेक्षणात शिवसैनिकांची आणि मराठी लोकांची मनस्थिती जाणून घेतल्यानंतर नियोजन करणे सोपे जाईल, असा त्यांनी भाजपसोबतच्या बैठकीत मत व्यक्त केल्याचं वृत्त आहे.

एकनाथ शिंदे या सर्वेक्षणासाठी एका नामांकित संस्थेला सर्वेक्षणाची जवाबदारी देणार आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे जनतेचा कौल, बंडखोरीबाबत त्यांना काय वाटते, हे समजणेही सोपे जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटतो. त्यांचे बंड मागे पडले की काय, अशी चिंताही शिंदे छावणीत सतावते आहे. खरंतर शिवसेनेचे 54 पैकी 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत, मात्र कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देतील की नाही याबाबत ते अजूनही साशंक आहेत. अशा परिस्थितीत या सर्व्हेच्या माध्यमातून त्याला जनतेचा मूड समजेल. तसेच राणे पितापुत्र, राज ठाकरे, किरीट सोमैय्या असे नेते उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना जितकं लक्ष करतील तितका उद्धव ठाकरेंना अधिक फायदा होईल अशी भीती देखील त्यांना आहे. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व मराठी वृत्त वाहिन्यांवरील युट्यूब, समज माध्यमांवरील वृत्त आणि त्यावरील ९९ टक्के प्रतिक्रया या शिंदे गटाच्या विरोधात असतात आणि त्यावरून कल कळतो आहे. त्याने शिंदे गट वरून शौर्य दाखवत असला तरी आतून धास्तावले आहे. बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या कुटुंबियांपासून भाषण आणि प्रतिक्रिया देऊन वेगळं करता येणार नाही हे त्यांना उमगलं आहे आणि त्यामुळे मागील २ महिन्यात त्यांना अनेक प्रशांनी घेरलं आहे.

पिता पेक्षा पुत्राला राजकीय करियरची धास्ती अधिक, त्यांनीच हे सुचवलं आणि भाजपचा सल्ला घेण्यात आला :
या सर्वेक्षणासाठी शिंदे कॅम्पने कर्नाटकातील पब्लिक पॉलिसी रिसर्च संस्था आणि दिल्लीस्थित इलेक्शन रिसर्च फर्म संबंधित लोकांची भेट घेतली आहे. या सर्वेक्षणाबाबत एकनाथ शिंदे कॅम्पकडून अद्याप कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नाही, मात्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ते केलं जात असल्याचं समजतं. सर्वेक्षणाची ही कल्पना एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत सर्वेक्षण करणाऱ्या फर्मच्या लोकांना त्यांनीच भेट दिली आहे. जाणून घेऊया सरकार आणि त्यानंतर पक्षावर आलेले संकट पाहता उद्धव ठाकरे कॅम्पही खूप सक्रिय आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde will make survey before election check details 05 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x