18 November 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

मी त्या राहुल गांधीला केव्हाच मागे सोडलंय असं ते का म्हणाले होते? आज सिद्ध झालं, वडिलांची ती चूक राहुल गांधींनी सुधारली आणि...

Congress leader Rahul Gandhi

Karnataka Assembly Election Result 2023 | १९९० मध्ये लिंगायत नेते वीरेंद्र पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. कर्नाटकातील दावणगेरे येथे ३ ऑक्टोबर १९९० रोजी हिंदूंची मिरवणूक काढल्यानंतर दंगल उसळली होती. या शोभायात्रेदरम्यान एका मुस्लीम मुलीचा विनयभंग झाल्याच्या वादाने मोठे रूप धारण केले होते. दोन्ही समाजात खूप रक्तपात झाला होता.

मोदी-शहांनी इतिहासातील तोच कटू किस्सा लक्षात ठेऊन निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक मुद्द्यांना भर देत सामान्य लोकांशी संबंधित महागाई, बेरोजगारी आणि इतर स्थानिक मुद्यांना बगल दिली होती. पण आता जग खूप पुढे गेलंय याचा विसर मोदी-शहांना पडला असावा. तरुणाईच्या मनात धार्मिक विष पेरून त्यांना त्यांच्या मूळ विषयांपासून दूर लोटणं इतकं सोपं नाही. नेमकं तेच राहुल गांधींनी हेरलं आणि मी ‘त्या’ राहुल गांधीला केव्हाच मागे सोडलंय असं ते का म्हणायचे याचा प्रत्यय या निवडणुकीत आला आहे.

त्यावेळी लिंगायत काँग्रेसवर नाराज का होते?
त्यावेळी मुख्यमंत्री पाटील (१९९०) यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते विश्रांती घेत होते. त्यामुळे दंगली आटोक्यात आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजीव गांधी तिथे आले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना विमानतळावरूनच हटवण्याचे आदेश दिले होते. यामुळे लिंगायतांमध्ये काँग्रेसविरोधात नाराजी निर्माण झाली आणि हळूहळू लिंगायत मतदार काँग्रेसपासून दूर गेले, अन्यथा लिंगायत हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार होते.

राहुल गांधींनी ती चूक केली नाही
तब्बल ३३ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी ती चूक सुधारत लिंगायतांना आपल्या बाजूने आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यासह अनेक लिंगायत नेत्यांना पक्षात सामावून घेतले आणि लिंगायत समाजाची वेगळ्या धर्माला दर्जा देण्याची जुनी मागणी मान्य केली.

या हालचालींमुळे संतप्त झालेल्या लिंगायत समाजातील एक मोठा वर्ग पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळला. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यापासून लिंगायत भाजपवर नाराज होते. ते भाजपशिवाय नव्या राजकीय शक्तीच्या शोधात होते, ज्याचा मार्ग सध्याच्या काँग्रेसकडे गेला. राजीव गांधी यांच्या त्यावेळच्या निर्णयानंतर लिंगायत समाज भाजपमध्ये गेला होता, त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात भाजप पक्ष मजबूत झाला होता. मात्र ती चूक राहुल गांधींनी टाळली आणि आज संपूर्ण दक्षिण भारत भाजप मुक्त झाला आहे.

काँग्रेसला ८० पैकी ५३ जागा
काँग्रेसला ४० वर्षांनंतर इतक्या जागा जिंकता आल्या आहेत. यात लिंगायत समाजाचे मोठे योगदान आहे. कर्नाटकात लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून ते विधानसभेच्या सुमारे ८० जागांवर पराभव आणि विजय निश्चित करतात. या 80 जागांपैकी काँग्रेसने 53 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला फक्त 20 जागा ंवर विजय मिळवता आला आहे. विधानसभेच्या 224 जागांपैकी 135 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.

पाटील यांना दोन वेळा अनपेक्षितपणे हटविण्यात आले
१९८९ मध्ये जेव्हा राजीव गांधी आणि कॉंग्रेसची केंद्रात सत्ता गेली, तेव्हा वीरेंद्र पाटील यांनी कर्नाटकात जनता दलाचे रामकृष्ण हेगडे आणि जनता पक्षाचे एच. डी. देवेगौडा या दोघांचाही पराभव करून पक्षाला प्रभावी विजय मिळवून दिला. त्या वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान झालेले देवेगौडा आपली विधानसभेची जागाही वाचवू शकले नाहीत. असे असतानाही चांगले प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटील यांना अनपेक्षित परिस्थितीत दोनवेळा मुख्यमंत्रिपद गमवावे लागले.

१९९० पूर्वी १९७१ मध्ये अशाच पद्धतीने त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोन्ही वेळा त्यांना हटवण्यात आले आणि कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राहुल गांधी यांनी ती चूक सुधारली असून लिंगायतांना टार्गेट करून या निवडणुकीत मोठी जात मिळवत राज्यात नवा विक्रम केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Congress leader Rahul Gandhi corrected father Rajiv Gandhi’s mistake on Lingayat community check details on 14 May 2023.

हॅशटॅग्स

#Congress leader Rahul Gandhi(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x