22 January 2025 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Video | बापरे! तेलंगणातही राहुल गांधींची लाट येणार, KCR यांची सत्ता धोक्यात, पहिल्याच सभेला अतिविराट रूप, लाखोंच्या संख्येने अलोट गर्दी

Rahul Gandhi

Rahul Gandhi Rally in Telangana | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यंत्रेणे संपूर्ण देशात काँग्रेससाठी राजकीय वातावरण बदललं आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक राज्यात काँग्रेसने मोठ्या बहुमताने भाजपकडून सत्ता खेचून घेतली आहे. तसेच आगामी तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचाच पहिला प्रत्यय आजच्या तेलंगणातील राहुल गांधी यांच्या अतिविराट सभेत पाहायला मिळाला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप आणि बीआरएसवर जोरदार हल्ला चढवला. ‘भारत जोडो यात्रेदरम्यान आम्ही देशाला एकत्र आणण्याबाबत बोललो होतो. द्वेष आणि हिंसेच्या प्रसाराला आमचा पाठिंबा नाही हे दाखवून संपूर्ण देशाने या यात्रेला पाठिंबा दिला असं राहुल गांधी म्हणाले.

गेल्या नऊ वर्षांत गरीब, मजूर, शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली – राहुल गांधी

खम्मम हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून जनतेने नेहमीच पाठिंबा दर्शविला आहे. इथले लोक आमची विचारधारा समजून घेतात…तेलंगण राज्य हे गरीब, शेतकरी आणि मजुरांचे स्वप्न होते. नऊ वर्षे टीआरएसने हे स्वप्न चिरडण्याचे प्रयत्न केले. आता टीआरएसने आपले नाव बदलून बीआरएस-भाजप रिलेटिव्ह कमिटी केले आहे असा घणाघात राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला.

‘पोलिस आणि बीआरएस नेत्यांवर अडथळ्याचा आरोप’

राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वी तेलंगणा काँग्रेसने आरोप केला होता की, सत्ताधारी बीआरएस नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिस आणि सरकारी यंत्रणा पक्षाच्या जाहीर सभेला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी अडथळे निर्माण करत आहेत. तेलंगण प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार ए. रेवंत रेड्डी यांनी राज्याचे डीजीपी अंजनी कुमार यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी पोलिसांवर टीका केली आणि दावा केला की सत्ताधारी बीआरएस जाहीर सभेवरून घाबरले होते.

वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका

हैदराबादपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या खम्मम मध्ये राहुल गांधी यांची विराट जाहीर सभा पार पडली. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्क यांच्या पदयात्रेचा समारोप म्हणून ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

केसीआर, बीआरएस वर भ्रष्टाचाराचे आरोप

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते भाजपच्या ताब्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला. ज्या गटात बीआरएसचा समावेश आहे, अशा कोणत्याही गटात काँग्रेस सहभागी होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘बीआरएस ही भाजपच्या रिलेशनशिप कमिटीसारखी आहे. केसीआर यांना वाटते की ते राज्याचे राजे आहेत आणि तेलंगण हे त्यांचे राज्य आहे असा राहुल गांधींनी घणाघात करत आरोप केला.

‘पंतप्रधान मोदींकडे केसीआरचा रिमोट कंट्रोल’

काँग्रेस नेहमीच संसदेत भाजपच्या विरोधात उभी राहिली आहे, पण राव यांचा पक्ष भाजपची बी-टीम आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट कंट्रोल आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने नुकतीच कर्नाटकमध्ये भ्रष्ट आणि गरीबी विरोधी सरकारविरोधात विधानसभा निवडणूक लढवली आणि राज्यातील गरीब, ओबीसी, अल्पसंख्याक आणि शोषितांच्या पाठिंब्याने त्यांना पराभूत केले.

तेलंगणात भाजप अस्तित्वात नाही, चारही टायर पंक्चर झाले आहेत – राहुल गांधी

तेलंगणातही असेच काहीसे घडणार आहे. एकीकडे राज्यातील श्रीमंत आणि बलाढ्य असतील, तर दुसरीकडे गरीब, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी आणि छोटे दुकानदार आपल्यासोबत असतील. कर्नाटकात जे घडले त्याची पुनरावृत्ती तेलंगणात होईल. तेलंगणात टीआरएस (तेलंगण राष्ट्र समिती, जी आता बीआरएस आहे), काँग्रेस आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत आहे, असे यापूर्वी म्हटले जात होते. पण तेलंगणात भाजप अस्तित्वात नाही. त्याचे चारही टायर पंक्चर झाले आहेत. आता ही लढत काँग्रेस आणि भाजपच्या बी-टीममध्ये आहे.

पार्टी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला

राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बब्बर सिंह आणि पक्षाचा कणा असे संबोधले. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही कर्नाटकप्रमाणे बीआरएसला पराभूत करू शकतो, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ‘भारत जोडो यात्रेदरम्यान आम्हाला येथून (तेलंगणा) मोठा पाठिंबा मिळाला आणि त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो,’ असे ते म्हणाले. या भेटीत आम्ही देशाला एकसंध करण्याविषयी बोललो. एकीकडे आपण देशाला एकसंध करण्याच्या विचारसरणीचे अनुसरण करतो आणि दुसरीकडे देश तोडण्याचा प्रयत्न करणारी दुसरी बाजू आहे असं राहुल गांधी म्हणाले.

News Title : Congress leader Rahul Gandhi Rally at Telangana check details on 02 July 2023.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x