8 November 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत अलर्ट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत असूनही शेअर प्राईस घसरतेय - NSE: NBCC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, रेटिंग अपडेट - NSE: ADANIENT Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Corona is Back | कोरोनावरून केलेली धार्मिक राजकीय विधानं शिंदे-फडणवीसांच्या अंगलट येणार? राज्य कोरोना विळख्यात, निर्बंधांची तयारी

Corona is Back

Corona is Back | एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसहित गुजरातमार्गे आसाम राज्यातून भाजपच्या मदतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीसांनी कोरोनासारख्या जागतिक गंभीर समस्येवरून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यासाठी या गंभीर विषयाचा संदर्भ थेट हिंदू धर्माशी जोडला होता. मात्र, आता त्यांचीच राजकीय कर्म आणि विधानं नियती त्यांच्यासमोर उभी करत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसहित म्हणजे ठाणे जिल्यातही कोरोना जोरात पसरतो आहे. यामध्ये लोकांचे मृत्यू देखील होऊ लागल्याने प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्राने देखील त्यासंदर्भात राज्य सरकारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-19 विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी चहल यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढली
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त चहल यांनी आढावा बैठक घेतली. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Corona is Back govt issues important guidelines check details on 10 April 2023.

हॅशटॅग्स

#Corona is Back(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x